क्रिकेटप्रेमी आणि नव्या पिढीच्या खेळाडूंसाठी प्रेरणा आणि स्मरणाचे स्थान म्हणून रमाकांत आचरेकर (Ramakant Aachrekar Memorial) सरांच्या स्मृती स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. हे स्मारक क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क (Chhatrapati Shivaji Maharaj Park), गेट क्रमांक ५ येथे स्मृती स्मारकाचे अनावरण करण्यात आले. ३ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता, भारतरत्न सचिन तेंडुलकर (Bharat Ratna Sachin Tendulkar) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते स्मृती स्मारकाचे अनावरण करण्यात आले.
या सोहळ्याला सरांनी घडवलेले अनेक शिष्य उपस्थित होते. याशिवाय आचरेकर सरांची मुलगी विशाखा दळवी, माजी क्रिकेटर प्रवीण आमरे (Former cricketer Praveen Amre) आणि आचरेकर कुटुंबीयही या अविस्मरणीय सोहळ्याला उपस्थित राहिले होते. २ जानेवारी २०१९ साली सरांच्या देहवासनानंतर सरांचे शिष्य आणि सरांच्या कामत क्लबचे माजी कर्णधार सुनील रामचंद्रन (रमणी) यांनी सरांच्या स्मरणार्थ स्मारक असावे, अशी इच्छा व्यक्त केली. पुढील पिढीला हे स्मारक सदैव प्रेरणादायी ठरावं म्हणून त्यांनी ही मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारला विनंतीही केली होती. त्यामुळे सरकारने त्यांच्या या मागणीची दखल घेऊन शिवाजी महाराज पार्क येथील स्मृती स्मारकास मान्यता दिली.
(हेही वाचा – Dachigam Encounter: काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश; लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या ठार)
सचिन तेंडुलकर आणि मनसेप्रमुख या स्मारकाचे सल्लागार राज ठाकरे यांच्या हस्ते स्मृती स्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळेस आचरेकर सरांची मुलगी विशाखा दळवी आणि कुटुंबीय, माजी क्रिकेटर प्रवीण आमरे उपस्थित होते.
.#Shivajipark #ramakantachrekarmemorial #sachintendulkar #cricketer pic.twitter.com/Hcbiww8qDC
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) December 3, 2024