Sri Siddhivinayak Temple परिसराचे सुशोभिकरण; महापालिकेने नियुक्त केला वास्तूशास्त्रीय सल्लागार

227
Sri Siddhivinayak Temple परिसराचे सुशोभिकरण; महापालिकेने नियुक्त केला वास्तूशास्त्रीय सल्लागार
  • सचिन धानजी, मुंबई

प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक मंदिर (Sri Siddhivinayak Temple) परिसराच्या सुशोभिकरणासाठी आणि आसपासची सुधारणा करण्यासाठी तब्बल ४९३.९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या उपलब्ध निधीतून या परिसराचे सुशोभिकरण करण्याचा आराखडा बनवण्यासाठी महापालिकेच्यावतीने वास्तुशास्त्रज्ञाची निवड करण्यात आली आहे. या कामासाठी वास्तूशास्त्रीय सल्लागार सेवेसाठी इंजिनिअस स्टुडीओ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

दादर प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर (Sri Siddhivinayak Temple) परिसराचे सुशोभीकरण आणि आसपासची सुधारणा करण्याचे काम महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि तत्कालिन स्थानिक आमदार व श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्या प्रयत्नाने हे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले. जगभरातील भाविक श्री सिद्धिविनायक मंदिरास (Sri Siddhivinayak Temple) मोठ्या संख्येने भेट देत असतात. तसेच जवळच नवीन मेट्रो रेल्वे स्थानक तयार होत असल्याने भविष्यात भाविकांची संख्या मोठ्या संख्येने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसराचे सुशोभिकरण आणि सुधारणा अंतर्गत वाढीव सुविधा उपलब्ध करून देणे, जसे की वाहनतळाची व्यवस्था, तसेच भाविकांसाठी एकत्र जमण्याचे ठिकाण बनवणे आदी कामे केली जाणार आहे.

(हेही वाचा – Amit Shah यांच्यासोबत अजित पवारांची भेट होणार का ?)

यासर्व कामांसाठी सुमारे ४७३ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यासाठी वास्तूशास्त्रीय सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. या सल्लागार कंपनीमार्फत नियोजित जागेचे परिरक्षण, अस्तित्वात असलेल्या जागेचे भूमापन करणे, जागेचे सर्वेक्षण करून मालकीबाबतचे अद्ययावत्त पी. आर. कार्ड, सी. टी. एस. भूमापन आराखडे इत्यादी सर्व कागदपत्रे विविध सरकारी कार्यालयातून पाठपुरावा करून प्राप्त करून घेणे आणि अस्तित्वात असलेल्या इमारतींचे मोजमाप करून आराखडे तयार करणे, तसेच श्री सिद्धिविनायक मंदिर (Sri Siddhivinayak Temple) न्यासाच्या आवश्यकतेनुसार बांधकाम आराखडा बनविणे, व त्यावर मान्यता प्राप्त करणे, महापालिकेतील विविध खात्यांकडून अभिप्राय प्राप्त करणे व आवश्यक त्या सबंधित प्राधिकरणाकडून प्रस्तावास ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे, खात्याच्या मान्यतेकरिता कल्पनात्मक नकाशे बनविणे आदी कामांचा समावेश आहे.

प्रकल्प पूर्ततेसाठी आवश्यक असलेली वैधानिक ना-हरकत प्रमाणपत्रे, तसेच बाह्य विभागाशी निगडित ना-हरकत प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी कार्य अंमलबजावणी विभागामार्फत अर्ज करून पाठपुरावा करणे. प्रकल्पाची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी, महानगरपालिका, राज्य सरकारी व केंद्र सरकारी विभाग तसेच अन्य प्राधिकरण यांची मंजुरी लागू असल्यास या विभागाच्या पडताळणी/मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत अर्ज करणे व परवानगी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करणे, खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे, प्रारूप निविदा तयार करणे, बांधकाम कंत्राटदार नियुक्ती करता सल्ला देणे, प्रकल्पांचे दररोजचे पर्यवेक्षण करणे, कंत्राटदाराच्या देयकाची पडताळणी करणे आदी कामांचा समावेश या वास्तूशास्त्रीय सल्लागार कंपनीवर असेल. या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास अंदाजे चोवीस (२४) महिने असा एकूण सत्तावीस (२७) महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. (Sri Siddhivinayak Temple)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.