Mumbai Fire Brigade मधील शौर्य पुरस्कार विजेत्यांना तब्बल ३६ वर्षांनी मिळणार खुशखबर; महापालिका घेणार ‘हा’ निर्णय

1307
Mumbai Fire Brigade मधील शौर्य पुरस्कार विजेत्यांना तब्बल ३६ वर्षांनी मिळणार खुशखबर; महापालिका घेणार 'हा' निर्णय
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई अग्निशमन दलात (Mumbai Fire Brigade) आसामान्य शौर्याबद्दल दिल्या जाणाऱ्या रौप्यपदक प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बक्षिस आणि रोख रकमेच्या पुरस्काराच्या वाढ केली जात असून तब्बल ३६ वर्षांनंतर या दलातील अधिकारी व जवानांना वाढ मिळणार आहे. सध्या देण्यात येणाऱ्या पुनरावर्ती पुरस्कारामध्ये १०० रुपयांवरून १५०० रुपये आणि ५० रुपयांवरून ७५० रुपये व बक्षिस रक्कमेत ५०० रुपयांवरून २००० रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. याचा लाभ तब्बल २४१ अग्निमशम दलातील पुरस्कार प्राप्त अधिकारी व जवानांना लाभ मिळणार आहे.

मार्च २०४५ मध्ये घेण्यात आला होता पहिला निर्णय

मुंबई अग्निशमन दलातील (Mumbai Fire Brigade) जे अधिकारी व कर्मचारी आग इत्यादींसारख्या प्रसंगी स्वत:हून असामान्य धैर्य दाखवतील, त्यांना प्रत्येकी अशा असामान्य शौर्याबद्दल रौप्यपदक व रोख रक्कम २५० रुपये बक्षिस म्हणून योजना सुरु करण्याचा निर्णय मार्च २०४५मध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर सन १९९३ मध्ये या रौप्यपदक मिळालेल्या व्यक्तींना त्यांच्या सेवा कालावधीत त्यांची चांगली वर्तणूक व शिस्त यासापेक्ष दरमहा ५ रुपये याप्रमाणे पुनरावर्ती पुरस्कार देण्याचे मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार या रौप्य पदकांच्या मानकऱ्यांच्या ते सेवेत असेपर्यंत दरमहा रुपये देण्यात येत होता.

(हेही वाचा – एकामागून एक मशिदींच्या खाली मंदिरे असल्याच्या हिंदूंच्या दाव्यांनंतर Muslim करत आहेत प्रार्थनास्थळ कायद्याची ढाल)

रक्कम १९८७ मध्ये वाढवून केली दुप्पट

अग्निशमन दलाच्या (Mumbai Fire Brigade) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रपतींकडून द्यावयाचे शौर्यपदक आणि महापालिकेचे असामान्य शौर्याबद्दल द्यावयाचे पदक याकरता विचारात घ्यायचे संकेत सारखेच असल्यामुळे शौर्य पदकाच्याच धर्तीवर मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी तथा कर्मचारी एखाद्या दुर्घटनेत असाधारण असे कर्तव्य बजावल्यास त्या अधिकारी तथा कर्मचारी यांना महापालिका आयुक्तांचे असाधारण शौर्याबद्दल रौप्य पदक देवून गौरवण्यात येते. पुनरावर्ती पुरस्काराच्या रकमेत जो फरक आहे, त्यात योग्य ते अंतर ठेवून महापालिकेच्या पदकासाठी तशीच नियमावली त्याच स्वरुप सध्या रोख रुपये ५०० रुपये बक्षिस प्रत्येक महिन्याला १०० रुपये आणि प्रत्येक महिना ५० रुपये आवर्ती बक्षिस असे आहे. ही रक्कम १९८७मध्ये वाढवून दुप्पट करण्यात आली होती, परंतु त्यानंतर आजतागायत ही वाढ झालेली नव्हती.

मसुद्याचे काम अंतिम झाल्यानंतर

त्यामुळे महापालिकेच्यावतीने १९८७पासून कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे जवळपास ३६ वर्षांनी असमान्य शौर्याबद्दल रौप्य पदकाच्या पुनरावर्ती पुरस्कारामध्ये वाढ करुन सध्या देण्यात येणाऱ्या १०० रुपयांवरून १५०० रुपये आणि ५० रुपयांवरून ७५० रुपये प्रतिमहिने एवढी वाढ करण्यात येत आहे. तसेच बक्षिस रकमेत ५०० रुपयांवरून २ हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पूर्वीच्या नियमावलीतमध्ये अंशत: बदल करून सुधारीत नियमावली बनण्यात आली असून याबाबतचा मसुदा बनवण्याचे काम सुरु आहे. याच्या मसुद्याचे काम अंतिम झाल्यानंतर आयुक्त तथा प्रशासकांची मंजुरी प्राप्त झाल्यांनतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Mumbai Fire Brigade)

(हेही वाचा – Thane News : ठाण्यात स्फोटकांसह एकाला अटक, १० गावठी बॉम्ब जप्त)

तब्बल २४१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई अग्निशमन दलात (Mumbai Fire Brigade) एकूण पुरस्कार प्राप्त विजेते अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या २१० एवढी असून एक पेक्षा जास्त वेळा पुरस्कार प्राप्त विजेते अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्या ३१ एवढी असून अनुक्रमे १५०० आणि २२५० रुपये प्रत्येक महिन्याला एवढी पुरस्काराची रक्कम देण्याचे प्रस्तावित होते. परंतु ही रक्कम आता सध्या देण्यात येणाऱ्या पुनरावर्ती पुरस्कारामध्ये १०० रुपयांवरून १५००रुपये आणि ५० रुपयांवरून ७५० रुपये व बक्षिस रक्कमेत ५०० रुपयांवरून २००० रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.