सुवर्णमंदिर परिसरात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री Sukhbir Singh Badal यांच्यावर जीवघेणा हल्ला

76
सुवर्णमंदिर परिसरात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री Sukhbir Singh Badal यांच्यावर जीवघेणा हल्ला
सुवर्णमंदिर परिसरात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री Sukhbir Singh Badal यांच्यावर जीवघेणा हल्ला

पंजाबचे (Punjab) माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिर (Suvarna Mandir) परिसरात झालेल्या या गोळीबारात ते थोडक्यात बचावले. सुवर्ण मंदिर प्रवेशद्वारावर सुखबीर सिंग बादल सेवा करत होते त्यावेळी एका व्यक्तीने अचानक गोळीबार केली. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ या हल्लेखोराला पकडले.

(हेही वाचा – Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी गडचिरोली हादरलं! कुठे जाणवले धक्के ?)

हल्लेखोर खलिस्तानी कारवायांमध्ये सामील असल्याचे सांगण्यात येत आहे. नारायण सिंह चौडा असं आरोपीचं नाव आहे. आरोपींवर यापूर्वीही अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.

शीख धर्मातील सर्वोच्च समिती अखाल तख्तने (Akhal Takht) नुकतेच सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावली होती. २०१५ मध्ये तत्कालीन अकाली सरकारच्या काळात सरकारकडून झालेल्या चुकांची कबुली दिल्यानंतर अखाल तख्तने सोमवारी बादल यांच्यासह तत्कालीन सरकारमधील मंत्र्‍यांना शिक्षा दिली होती. यामध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील शौचालय साफ करणे, लंगरमध्ये सेवा देणे आणि भांडी धुण्याची शिक्षा सुनावली होती. त्याच शिक्षेचा भाग म्हणून बादल हे सुवर्ण मंदिरात प्रवेशद्वारावर सेवा देत होते. त्या वेळी ही घटना घडली.

सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) सुवर्ण मंदिराच्या दरबार साहिबच्या गेटवर द्वारपाल म्हणून काम करत होते. तेवढ्यात समोरून हल्लेखोर आला आणि त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सुखबीर सिंह बादल यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका सुरक्षारक्षकाने हल्लेखोराला थांबवले आणि गोळी झाडली. मात्र, ही गोळी कोणालाही लागली नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.