Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : येत्या काळात लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार ?

92
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : येत्या काळात लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार ?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : येत्या काळात लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार ?

महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. उद्या (५ डिसेंबर) आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यादरम्यान, एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. निवडणुकांपूर्वी महायुतीनं (Mahayuti) सर्व लाडक्या बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांना दरमहा 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता हे आश्वासन महायुती पूर्ण करणार आहे. तसेच, आता या योजनेच्या लाभार्थी बहिणींबाबत सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा- Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी गडचिरोली हादरलं! कुठे जाणवले धक्के ?

लाडकी बहीण योजनेबाबत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर, राज्यभरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे. 2 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतल्यानंतर, सरकार आता केवळ पात्र महिलांपर्यंतच मदत पोहोचतेय ना? खात्री करण्यावर भर देणार आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)

हेही वाचा- Manipur Violence: बेपत्ता मैतेई माणसाचा शोध युद्धपातळीवर सुरू; लष्कराचे २ हजार जवान, ड्रोन, हेलिकॉप्टरच नव्हे तर श्वानपथकाचीही घेतली जातेय मदत

या पडताळणी प्रक्रियेचा उद्देश या योजनेसाठी केलेले अर्जदारांचे दावे योग्य आहेत की, नाही हे तपासणं हा आहे, जेणेकरून आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता येईल, असं सांगितलं जात आहे. योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला या पडताळणी प्रक्रियेतून जावं लागेल, ज्याच्या मदतीनं खोटे दावे करून योजनेचा लाभ घेणाऱ्यांना काढून टाकलं जाईल. राज्याच्या वित्त विभागाच्या म्हणण्यानुसार, या योजनेंतर्गत आधीच हप्ते घेतलेल्या जवळपास सर्व 2 कोटी अर्जदारांना या तपासणीत समाविष्ट केलं जाईल. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)

हेही वाचा- Weather Update: मुंबईत पावसाच्या हलक्या सरी; IMD ने दिला कोल्हापूरसह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

या प्रक्रियेद्वारे, खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची उलटतपासणी केली जाईल. अशाप्रकारे, या योजनेंतर्गत ज्या पात्र अर्जदारांना आर्थिक मदतीची गरज आहे, त्यांनाच सरकारी मदत मिळावी, असा वित्त विभागाचा प्रयत्न असणार आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)

हेही वाचा- भारतात Drug Smuggling साठी एलन मस्क यांच्या स्टारलिंकच्या उपकरणांचा वापर; पोलीस करणार सखोल तपास

नियम : (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)

उत्पन्नाचा पुरावा : अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्रं सादर करणं आवश्यक आहे, ज्याची मर्यादा वार्षिक 2.5 लाख रुपये आहे.

आयकर प्रमाणपत्र : लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जांची छाननी केली जाईल.

सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी : निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरं जावं लागेल.

लँड ओनरशिप : पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील.

एका कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा : एका कुटुंबातील एकाहून अधिक दाव्यांची समस्या सोडवून प्रति कुटुंब फक्त दोन महिलांना हा लाभ दिला जाईल.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.