Navi Mumbai Crime : हैद्राबाद येथून आलेला कोट्यवधींचा ड्रग्स नवी मुंबईतुन जप्त, डीआयआरची कारवाई

52
Navi Mumbai Crime : हैद्राबाद येथून आलेला कोट्यवधींचा ड्रग्स नवी मुंबईतुन जप्त, डीआयआरची कारवाई
Navi Mumbai Crime : हैद्राबाद येथून आलेला कोट्यवधींचा ड्रग्स नवी मुंबईतुन जप्त, डीआयआरची कारवाई

हैद्राबाद येथून मुंबईकडे बसमधून अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चार तस्करांना नवी मुंबईतील (Navi Mumbai Crime) वाशी (Vashi) येथून अटक करण्यात आली आहे. या चौघांजवळ १६ किलो एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी डीआरआय (DRI) केली आहे. मनीष बर्दावाल, रविंदर बर्धवार, महेश खरवा आणि सुलतान अहमद अब्दुल लतीफ शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

(हेही वाचा – Chembur मध्ये डिजिटल अरेस्ट मध्ये १२ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक)

डीआरआयच्या (DRI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरआयच्या मुंबई विभागाला माहिती मिळाली होती की, हैदराबादहून मुंबईला येणाऱ्या बसमधून रवी आणि मनीष नावाच्या दोन व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन या अमली पदार्थाची तस्करी करण्यात येत आहे, आणि ही बस मंगळवारी वाशी (नवी मुंबई) येथे पोहोचणार आहे. या माहितीत पुढे असे सूचित करण्यात आले आहे की, सदर व्यक्ती वडोदरा येथून विशेषत: मुंबईत आलेल्या महेश खारवा याला प्रतिबंधित अमली पदार्थ पोहोचवत आहेत आणि मुंबईत मांडवी जवळील एका हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. त्याबदल्यात तो सुलतान उर्फ ​​महाराज रा. नूरबाग, मुंबई या नावाच्या व्यक्तीला हा माल द्यायचा. (Navi Mumbai Crime)

(हेही वाचा – Mumbai Fire Brigade मधील शौर्य पुरस्कार विजेत्यांना तब्बल ३६ वर्षांनी मिळणार खुशखबर; महापालिका घेणार ‘हा’ निर्णय)

या माहितीवर कारवाई करत अधिकाऱ्यांनी वाशी उड्डाणपूलजवळील बस स्टॉपजवळ रविंदर आणि मनीष यांना अडवले. त्यांनी १६ किलो एमडी घेऊन गेल्याची पुष्टी केली आणि ते हैदराबादहून मुंबईला मेफेड्रोन पुरवण्यासाठी एकत्र प्रवास करत होते. त्यानंतर हा अंमली पदार्थ डीआरआय अधिकाऱ्यांनी जप्त केला. डीआरआयने (DRI) खरवाला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत तो मनीष आणि रविंदर यांच्याकडून १६ किलो मेफेड्रोनची डिलिव्हरी घेऊन ते अमली पदार्थ पुढे त्याचा एक साथीदार सुलतान अहमद अब्दुल लतीफ शेख याला देणार होता, या बदल्यात त्याला झटपट आणि सहज पैसे मिळणाऱ होते, असे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर सुलतान अहमद अब्दुल लतीफ शेख याला डीआरआय (DRI) अधिकाऱ्यांनी अटक केली. (Navi Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.