Border Gavaskar Trophy, Adelaide Test : दिवस – रात्र कसोटीत भारताची आतापर्यंतची कामगिरी कशी आहे?

Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ऑस्ट्रेलियात दिवस - रात्र कसोटींत भारताच्या आठवणी फारशा चांगल्या नाहीत.

96
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेड ओव्हलची खेळपट्टी कशी असेल? क्युरेटर काय म्हणाले?
  • ऋजुता लुकतुके
यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची शतकं आणि बदली कर्णधार जसप्रीत बुमराहचे सामन्यात ८ बळी यांच्या जोरावर भारताने पहिली पर्थ कसोटी २९५ धावांनी जिंकली आहे. आणि मालिकेतही १-० ने आघाडी घेतली आहे. आता दुसरी कसोटी ॲडलेड इथं ६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ही कसोटी दिवस – रात्र होणार आहे. आणि भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियात गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव आतापर्यंत तरी खास नाही. चार वर्षांपूर्वी ॲडलेड ओव्हलवरच भारतीय संघ पहिल्या डावांत ३६ धावांवर सर्वबाद झाला होता. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)
पण, एरवी जगभरातील दिवस – रात्र कसोटींचा आढावा घेतला तर भारतीय संघाची विजयाची टक्केवारी ही भरीव म्हणजे ७५ टक्के इतकी आहे. ॲडलेड कसोटीची तयारी करताना हा रेकॉर्ड भारतीय संघाने लक्षात ठेवावा असाच आहे. भारताची दिवस – रात्र कसोटींची आकडेवारी पाहूया,
  • भारतीय संघ आतापर्यंत ४ दिवस – रात्र कसोटी सामने खेळला आहे. यातील ३ भारताने जिंकल्या आहेत. तर एक गमावली आहे.
  • विराट कोहलीने (Virat Kohli) २०१९ च्या कोलकाता कसोटीत बांगलादेश विरुद्ध १३६ धावा केल्या होत्या. भारतीय फलंदाजाने दिवस – रात्र कसोटीत केलेलं हे एकमेव शतक आहे.
  • एखाद्या दिवस – रात्र कसोटीत कप्तानाने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम जो रुट आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या नावावर विभागून आहे. जो रुटनेही १३६ धावा केल्या होत्या.
  • दिवस – रात्र कसोटींत ऑस्ट्रेलियाची यशाची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे ९१.६७ टक्के इतकी आहे. त्यांनी ओळीने ८ दिवस – रात्र झालेल्या कसोटी जिंकल्या आहेत. २०२४ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध संघाला पराभवाची पहिली चव चाखावी लागली.
  • ॲडलेड ओव्हलमध्ये २०१५ पासून ७ दिवस – रात्र कसोटी झाल्या आहेत. आणि यात ऑस्ट्रेलियाने सातही जिंकल्या आहेत. त्यामुळे मालिकेत वर्चस्व कायम राखायचं असेल तर भारताला ही सद्दी मोडून काढावीच लागेल.
  • जागतिक स्तरावर दिवस – रात्र कसोटींमध्ये आतापर्यंत फक्त दोनच त्रिशतकं पाहायला मिळाली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तान विरुद्ध ॲडलेड ओव्हलवरच ३३४ धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानच्या अझर अलीने दुबईत वेस्ट इंडिज विरुद्ध ३०२ धावा केल्या होत्या. ॲडलेड ओव्हलवरील त्रिशतक २०१९ मध्ये झालं होतं.
  • डिसेंबर २०२० मध्ये भारतीय संघ ॲडलेड कसोटीत ३६ धावांमध्ये सर्वबाद झाला होता. दिवस – रात्र कसोटीतील ही नीच्चांकी धावसंख्या आहे.
  • इंग्लंड (५८ व ८१) तर वेस्ट इंडिज (९३ व ७७) या दोनच संघांनी आतापर्यंत दिवस – रात्र कसोटीत १०० पेक्षा कमी धावसंख्येत दोनदा बाद होण्याची कामगिरी केली आहे.
  • ऑस्ट्रेलियाने २०१९ मध्ये पाकिस्तान विरुद्ध ॲडलेड कसोटीतच ३ बाद ५८९ धावा केल्या होत्या. दिवस – रात्र कसोटीत एका डावांतील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे.
  • भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने कोलकाता कसोटींत ७० धावांत ११ बळी मिळवले होते. दिवस – रात्र कसोटीतील ही गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर पॅट कमिन्स आणि देवेंद्र बिशू या इतर दोनच गोलंदाजांनी कसोटीत १० बळी मिळवले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.