Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसच भाजपचे विधीमंडळ पक्षनेते!

89
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसच भाजपचे विधीमंडळ पक्षनेते!
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसच भाजपचे विधीमंडळ पक्षनेते!

भाजपचे (BJP) विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) नाव निश्चित करण्यात आले आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत झालं आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हा प्रस्ताव मांडला. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचा कारभार सांभाळतील.

बैठकीत काय घडलं?
या बैठकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण हे हजर होते. यावेळी गटनेतेपदासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरु झाली आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण यांनी या प्रस्तावावर अनुमोदन दिले. (Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर फडणवीस आजच राज्यापालांना सत्ता स्थापनेचं पत्र देणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी फडणवीस यांच्यासोबत अजित पवार असण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्यासोबत असतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) आणि विजय रुपाणी हे भाजपचे दोन्ही निरीक्षक राजभवनावर शिष्टमंडळासोबत जाण्याची शक्यता आहे. (Devendra Fadnavis)

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
आता भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडल्यानंतर महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. यानंतर उद्या गुरुवारी ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या होईल, असे सांगितले जात आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित असणार आहेत. या सोहळ्याला अमित शाह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर, धर्मगुरु, संत-महंत उपस्थित राहणार आहेत. (Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.