Devendra Fadnavis यांचे विधीमंडळ पक्षनेते म्हणुन निवड झाल्यानंतर विधानभवनात भाषण; म्हणाले…

125
शपथविधी सोहळ्यापूर्वी Devendra Fadnavis यांनी महाकाल मंदिराकडून मागवला भस्म-प्रसाद; पुजाऱ्यांनाही निमंत्रण
शपथविधी सोहळ्यापूर्वी Devendra Fadnavis यांनी महाकाल मंदिराकडून मागवला भस्म-प्रसाद; पुजाऱ्यांनाही निमंत्रण

भाजपचे (BJP) विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) नाव निश्चित करण्यात आले आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत झालं आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हा प्रस्ताव मांडला. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचा कारभार सांभाळतील.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “मी सगळ्यांचे आभार मानतो की, विधिमंडळ गटनेता म्हणून सगळ्यांनी माझी निवड केली. यावेळची निवडणूक ऐतिहासिक अशी होती. या निवडणुकीचं विश्लेषण करायचं जर झालं तर या निवडणुकीनं आपल्यासमोर एक गोष्ट निश्चित केली आहे. ती म्हणजे एक है, तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है. मोदींच्या नेतृत्वात देशात विजयाची मालिका लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने दिलेल्या कौलानंतर जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो.”

हेही वाचा- Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसच भाजपचे विधीमंडळ पक्षनेते!

“मी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व अजित पवार (Ajit Pawar) यांचे आभार मानतो. रामदास आठवले आणि आमच्या सर्व मित्रपक्षांचेही आभार मानतो. संविधानाची यावेळी ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यामुळे सर्वार्थानं महत्त्वाचं असं हे वर्षं आहे. मोदी नेहमी सांगतात की, कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा माझ्यासाठी देशाचं संविधन सर्वात महत्त्वाचं आहे. या संविधानाने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा, मोठं होण्याचा अधिकार दिला. भारताला उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं. संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा सरकार स्थापन करतोय.” (Devendra Fadnavis)

हेही वाचा- Bangladesh : बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याची मागणी!

“एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा मोदींनी या पदावर बसवलं. अर्थात, एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा मान मोदींनी दिला. हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्याला वेगवेगळी पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही आभार मानतो.” (Devendra Fadnavis)

हेही वाचा- Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : येत्या काळात लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार ?

“आपल्याला सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करता येत नाहीत. पण आपण एक मोठं ध्येय घेऊन राजकारणात आलो आहोत. फक्त पदांसाठी आलेलो नाही. त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा आहे की येत्या काळात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील, काही गोष्टी मनाविरुद्ध होतील. तरीही आपण सगळे व्यापक हितासाठी एकत्र काम करू आणि आपली शक्ती दाखवून देऊ.” असं फडणवीस म्हणाले आहेत. (Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.