Oath Ceremony Maharashtra : देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री; महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार

128
Oath Ceremony Maharashtra : देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री; महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार
Oath Ceremony Maharashtra : देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री; महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार

विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नव्हता. ४ डिसेंबर रोजी भाजपच्या भाजपच्या विधीमंडळ बैठकीत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली. आता दुपारी साडे तीनच्या सुमारास महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यपालांकडे महायुती सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यामुळे राज्यात पुढील ४८ तासांत नवीन सरकार स्थापन होणार आहे. (Oath Ceremony Maharashtra)

(हेही वाचा – Devendra Fadnavis यांचे विधीमंडळ पक्षनेते म्हणुन निवड झाल्यानंतर विधानभवनात भाषण; म्हणाले…)

सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

भाजपाच्या (BJP) बैठकीनंतर गेल्या १० दिवसांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. भाजपाने यंदाच्या निवडणुकीत १३२ जागा मिळवल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपाने पहिल्यांदाच इतका मोठा विजय मिळवला आहे. आता ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्‍यांसह अन्य मंत्र्‍यांचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मान्यवर रहाणार उपस्थित

सरकारच्या शपथविधी सोहळ्याला ७० हून अधिक व्हीव्हीआयपी नेते उपस्थित रहाणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे, या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील ४०० हून अधिक साधू-संतांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. (Oath Ceremony Maharashtra)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.