Uddhav Thackeray : उबाठा शिवसेना लढणार महापालिका निवडणूक स्वबळावर?

71
Uddhav Thackeray : उबाठा शिवसेना लढणार महापालिका निवडणूक स्वबळावर?
Uddhav Thackeray : उबाठा शिवसेना लढणार महापालिका निवडणूक स्वबळावर?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी मुंबईतील नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत हिंदुत्वासाठी आपली शिवसेना आधीही लढत आहे. आणि उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा सोडणाऱ्या आणि काँग्रेस पक्षाशी हात मिळवणी करणाऱ्या शिवसेना (उबाठा) पक्षाला अपयश आल्याने त्यांना हिंदुत्वा शिवाय पर्याय नसल्याचे उमलगल्याने त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या दिशेने जाण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतून ते बाहेर पडून स्वतंत्र निवडणूक लढवतील याचे स्पष्ट संकेतच मानले जात आहेत. त्यामुळे काँग्रेस नको आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही नको, महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अप्रत्यक्षपणे ‘एकला चलो रे ‘चा नारा देत आपल्या नगरसेवकांना विभागात कामाला लागण्याचे निर्देश दिले आहे.

शिवसेना उबाठा पक्षाचे मुंबईतील नगरसेवकांची बैठक मंगळवारी पार पडली. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत घेतलेल्या या बैठकीत ९४ पैकी ३० ते ३५ नगरसेवक हजर होते. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर मुंबईतील नगरसेवकांची ही पहिलीच बैठक उध्दव ठाकरे यांनी घेत त्यांना मार्गदर्शन केले. यात त्यांनी ,शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मुंबई महापालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवा, हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत आहे उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार असे सांगितले. आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे… त्याला योग्य तो प्रतिवाद करा, अशाही सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या नगरसेवकांना केल्या.

(हेही वाचा – Mumbai Police : पोलिसांच्या आवाहनानंतर, भाजपाचे नेते ट्रेन प्रवास करणार का?)

आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा. मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे असे सांगत. ईव्हीएमचा मुद्दा तर आहे. मात्र,त्याबाबत आम्ही बघू. तुम्ही संघटनात्मक बांधणी आणि ताकतीने कामाला लागा असे सांगत निवडणुका कधीही लागतील त्यामुळे गाफील राहू नका असाही इशारा दिला. पुन्हा लोकांमध्ये जा आणि नव्याने ताकतीने कामाला लागा, असे आवाहन केले.

मात्र, उबाठा शिवसेनेचे हे हिंदुत्व काँग्रेस पक्षाला मान्य होणारे नसून एका बाजूला हिंदुत्ववादी पक्षा विरोधात लढणाऱ्या काँग्रेसला उबाठा शिवसेनेची भूमिका मान्य नसून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने ही भूमिका पटलेली नाही. मात्र,बाबतच्या बातम्या दिल्लीला पाठवून हायकमांडला कल्पना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – भारतात Drug Smuggling साठी एलन मस्क यांच्या स्टारलिंकच्या उपकरणांचा वापर; पोलीस करणार सखोल तपास)

मात्र, दुसरीकडे उबाठा शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी लोकसभा निवडणुकीत मुस्लिम लोकांनी मोदी विरोधात म्हणून आम्हाला मतदान केले, पण ते विधान सभेत दिसले नाही. त्यातच काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी कोणतीही मदत केली नाही. उलट आमच्याच मदतीवर आमचे आणि काँग्रेसचे आमदार निवडून आल्याचा दावा या नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे आपल्या पक्षाने या महाविकास आघाडी मधून बाहेर पडून महापालिका निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढवावी अशीच भूमिका आणि पहिल्यापासून घेत आलो आहोत. त्यातच उद्धव साहेबांनी, हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यामुळे आता सुंठी वाचून खोकला जाईल आणि महाविकास आघाडीतून आपल्या पक्ष बाहेर पडून स्वतंत्र महापालिका निवडणुकीला सामोरे जाईल अशी तरी शक्यता आता निर्माण झाली आहे,असे वाटते असे नगरसेवकांचे म्हणणं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.