double decker bus mumbai : मुंबईत डबल डेकर बसचे भाडे किती आहे?

42
double decker bus mumbai : मुंबईत डबल डेकर बसचे भाडे किती आहे?

डबल-डेकर बस हे मुंबईतील वाहतुकीचे एक लोकप्रिय साधन आहे, खासकरून पर्यटक आणि स्थानिक लोकांसाठी जे शहरातून निसर्गरम्य प्रवासाचा आनंद घेऊ इच्छितात. पूर्वी ठिकठिकाणी डबल डेकर बस दिसायची. मात्र काळा च्या ओघात ती नष्ट झाली. तरी आजही काही ठिकाणी आणि विशिष्ट गोष्टींसाठी डबल डेकर बस अस्तित्वात आहे. (double decker bus mumbai)

मुंबई दर्शन बस

पर्यटक आकर्षण :
मुंबई दर्शन बसमध्ये तुम्ही पूर्ण दिवस मुंबईच्या प्रतिष्ठित स्थळांचा दौरा करु शकता. गेटवे ऑफ इंडियापासून सुरू होते आणि मरीन ड्राइव्ह, जुहू बीच आणि आणखी काही ठिकाण तुम्ही पाहू शकता.

मुंबईत फिरायला येणार्‍यांसाठी तर ही डबल डेकर बस म्हणजे पर्वणीच आहे. या बसमध्ये शिरल्यावर जुन्या मुंबईची अठवण येते. बेस्ट डबल डेकर बसेस बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) द्वारे संचालित आहेत. (double decker bus mumbai)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : शिंदे आजारी, आमदार देवेंद्रद्वारी; सत्ताकेंद्राचा नवा पत्ता ‘सागर बंगला’)

तिकिटाची किंमत :
एका दिवसाच्या टूरसाठी सुमारे रु. २००-रु. ३५०.

वातानुकूलित :
बस वातानुकूलित आहे, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही आरामदायी प्रवास करता येतो.

इलेक्ट्रिक डबल-डेकर :
पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बेस्टने भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल-डेकर वातानुकूलित बस सादर केली आहे. (double decker bus mumbai)

आणखी ९०० नवीन एसी डबल-डेकर ई-बस मुंबईच्या रस्त्यावरुन धावण्याची योजना आहे. आता बघुया मुंबईकरांचं हे स्वप्न कधी पूर्ण होतं ते…

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमापासून एक पाऊल दूर)

Hop On Hop Off (HoHo) Bus
सेवा : HoHo बस सेवेमुळे पर्यटकांना त्यांच्या स्वत:च्या सोयीने मुंबईचे दर्शन घेता येते.

तिकिटाची किंमत : एका दिवसाच्या टूरसाठी सुमारे रु. ३५०.

आकर्षण :
मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, बाबुलनाथ मंदिर आणि बरेच काही…

डबल-डेकर बसेस मुंबईच्या रस्त्यांवरुन धावताना अतिशय सुंदर दिसते. मुंबईत आता गर्दी वाढत आहे. त्यामुळे या बसेसची आता नितांत आवश्यकता आहे. तुम्हाला काय वाटते? (double decker bus mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.