Devendra Fadnavis हे शरद पवारांचा रेकॉर्ड मोडणार?

105
Devendra Fadnavis हे शरद पवारांचा रेकॉर्ड मोडणार?
  • सुजित महामुलकर

भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक झाली आणि त्यात पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री फडणवीसच होणार हे नक्की झाले. फडणवीस हे गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ या दिवशी राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. आतापर्यंत जे मुख्यमंत्री झाले त्यातील एका निकषात देवेंद्र फडणवीस हे पुढील एक वर्षे सात महिन्यात, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर मात करू शकतील, अशी शक्यता आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : शिंदे आजारी, आमदार देवेंद्रद्वारी; सत्ताकेंद्राचा नवा पत्ता ‘सागर बंगला’)

फडणवीस पवारांच्या जवळ

शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून चारवेळा शपथ घेतली आहे तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. असे असले तरी ‘मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ’ या निकषात फडणवीस हे शरद पवार यांच्या जवळ पोहोचले असून पुढील एकोणीस महिन्यात पवार यांच्यावर मात करत पुढच्या क्रमांकावर जातील.

(हेही वाचा – Chembur मध्ये डिजिटल अरेस्ट मध्ये १२ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक)

फडणवीसांचा ५ वर्षे १८ वा दिवस

कॉंग्रेस नेते वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळ म्हणजेच सलग ११ वर्षे ७८ दिवस राहिलेले मुख्यमंत्री आहेत. नाईक तीन टर्ममध्ये सलग तीनवेळा मुख्यमंत्री पदावर राहिले. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर विलासराव देशमुख ७ वर्षे आणि १२९ दिवस मुख्यमंत्रीपदी होते. तिसऱ्या क्रमांकावर शरद पवार यांचा कार्यकाळ हा ६ वर्षे २२१ दिवस इतका असून चौथ्या स्थानावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आहेत. त्यांचा कार्यकाळ ५ वर्षे १७ दिवस आहे. गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस ५ वर्षे १८ वा दिवस सुरू होईल आणि एक-एक पाऊल पुढे टाकत पवार यांचा रेकॉर्ड मोडतील तसेच त्यानंतर विलासराव देशमुख यांच्या रेकॉर्डकडे कूच करतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.

(हेही वाचा – Uddhav Thackeray : उबाठा शिवसेना लढणार महापालिका निवडणूक स्वबळावर?)

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले पहिले पाच नेते :

वसंतराव नाईक :

कार्यकाळ : ५ डिसेंबर १९६३ ते २१ फेब्रुवारी १९७५

एकूण कार्यकाळ : सलग ११ वर्षे ७८ दिवस

विलासराव देशमुख :

कार्यकाळ : १८ ऑक्टोबर १९९९ ते १८ जानेवारी २००३ आणि १ नोव्हेंबर २००४ ते ८ डिसेंबर २००८

एकूण कार्यकाळ : ७ वर्षे १२९ दिवस

शरद पवार :

कार्यकाळ : १८ जुलै १९७८ ते १ फेब्रुवारी १९८०, २६ जून १९८८ ते ४ मार्च १९९०, ४ मार्च १९९० ते २५ जून १९९१ आणि ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५

एकूण कार्यकाळ : ६ वर्षे २२१ दिवस

देवेंद्र फडणवीस :

कार्यकाळ : ३१ ऑक्टोबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१९ आणि २३ नोव्हेंबर २०१९ ते २८ नोव्हेंबर २०१९

एकूण कार्यकाळ : ५ वर्षे १७ दिवस

शंकरराव चव्हाण :

कार्यकाळ : २१ फेब्रुवारी १९७५ ते १७ मे १९७७ आणि १२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८

एकूण कार्यकाळ : ४ वर्षे १९१ दिवस

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.