Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावर रात्री पुन्हा झाली बैठक

107
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावर रात्री पुन्हा झाली बैठक
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावर रात्री पुन्हा झाली बैठक

मुंबईतील आझाद मैदानावर आज महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. या सोहळ्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का, याविषयी अजूनही सस्पेन्स कायम असला, तरी वर्षा बंगल्यावर रात्री झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना राजी करण्यास देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. (Eknath Shinde Oath)

बुधवार, 4 डिसेंबर या दिवशी दिवसभरात दोन वेळा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मात्र, एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदाबाबत ठाम असल्यामुळे खातेवाटपाबाबत तोडगा निघू शकलेला नाही.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : संयमानं परीक्षा घेतली; पण तो मेरिटमध्ये आला; आईने दिली कौतुकाची थाप)

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही आज शपथविधी व्हावा, ही एकनाथ शिंदे यांची मागणी आहे. शिवसेनेला अपेक्षित खाती आणि संभाव्य मंत्र्यांबाबतही त्यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या सगळ्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून कळवणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना सांगितले.

बुधवारी राजभवनावरील पत्रकार परिषदेत एकाने एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) प्रश्न विचारला की, तुम्ही आणि अजितदादा (Ajit Pawar) उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहात का? त्यावर संध्याकाळपर्यंत धीर धरा, सगळं काही समजेल असं शिंदेंनी उत्तर दिले त्याचवेळी अजित पवारांनी संध्याकाळपर्यंत त्यांचे काय ते समजेल पण मी उद्या शपथ घेणार आहे. अजितदादांच्या या उत्तरावर पत्रकार परिषदेत हशा पिकला होता. त्यानंतर शिंदे यांची मनधरणी करण्यात आली आहे, असे सांगितले जाते. (Eknath Shinde Oath)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.