Border Gavaskar Trophy, Adelaide Test : के एल राहुल ॲडलेडमध्ये सलामीलाच येणार का?

Border Gavaskar Trophy, Adelaide Test : राहुलने या प्रश्नावर मजेशीर उत्तर दिलं.

74
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : के एल राहुल ॲडलेडमध्ये सलामीलाच येणार का?
Border Gavaskar Trophy, Adelaide Test : के एल राहुल ॲडलेडमध्ये सलामीलाच येणार का?
  • ऋजुता लुकतुके

के एल राहुलने (KL Rahul) पर्थ कसोटीत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत सलामीवीराची भूमिका बजावली. आणि पहिल्या डावांत २७ आणि दुसऱ्या डावांत ७७ धावा करून त्याने ती चोख निभावलीही. पण, आता रोहित शर्मा (Rohit Sharma) सुटीवरून परतला आहे. ॲडलेड कसोटीत पुन्हा संघाचं नेतृत्व करण्यासाठीही तो सज्ज झाला आहे. अशावेळी के एल राहुलला (KL Rahul) संघात स्थान मिळणार हे नक्की. पण, तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार हा आता प्रश्न आहे.

त्याची पर्थमधील कामगिरी आणि दुसऱ्या डावात जयस्वाल सोबत केलेली २०१ धावांची भागिदारी यामुळे अनेकांना ही जोडी बिघडवावी असं वाटत नाहीए. त्यामुळे राहुलला सलामीला खेळवून रोहितला मधल्या फळीत खेळवावं असा सूर वाढत चालला आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत भारतीय पत्रकारांनी हाच प्रश्न के एल राहुलला विचारला. त्यावर राहुलने मात्र मजेशीर उत्तर दिलं. ‘मी अंतिम अकरांत आहे तोपर्यंत कुठेही खेळलेलं मला चालेल,’ असं उत्तर त्याने दिलं आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

(हेही वाचा – Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावर रात्री पुन्हा झाली बैठक)

‘मी कुठल्या क्रमांकावर खेळणार हे मला आज सांगता येणार नाही. ते सांगायचं नाही, असं मला सांगितलं गेलंय. त्यामुळे तुम्हाला माझा क्रमांक सामन्याच्या दिवशीच कळेल. किंवा सामन्यापूर्वी कर्णधाराच्या परिषदेत रोहित (Rohit Sharma) कदाचित यावर भाष्य करू शकेल,’ असं पुढे राहुल (KL Rahul) म्हणाला.

(हेही वाचा – Devendra Fadnavis मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार! आझाद मैदानावर महायुतीच्या शपथविधीला ‘या’ दिग्गजांची उपस्थिती

मागच्या रविवारी कॅनबेरा इथं झालेल्या सराव सामन्यात राहुल आणि जयस्वाल हेच दोघं सलामीला आले. आणि त्यांनी ७५ धावांची सलामी संघाला करून दिली. राहुल २७ धावांवर नाबाद तंबूत परतला. इतरांना सरावाची संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. या सामन्यात रोहित चौथ्या क्रमांकावर खेळला. आणि ३ धावा करून बाद झाला. गुलाबी चेंडूवर फलंदाजी करण्याबद्दल राहुल (KL Rahul) म्हणाला, ‘मी यापूर्वी कधी गुलाबी चेंडूवर खेळलो नव्हतो. त्यामुळे माझी रणनीती सोपी होती. चेंडू आणि प्रतिस्पर्धी गोलंदाज यांचा आदर करायचा. चेंडू जसा असेल तसा खेळण्याचा प्रयत्न करायचा. तेच मी केलं. आणि ॲडलेडमध्येही तेच करणार आहे.’ (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)

एकदा सुरुवातीची २५ षटकं खेळून काढता आली तर जगात कुठेही आणि कुठल्याही वेळी धावा करता येतात असं साधं गणित के एल राहुलने मांडलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.