-
ऋजुता लुकतुके
एरवी ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरीच कसोटी कधी निर्णायक ठरत नाही. दोन्ही संघांना पुढेही मालिकेत परतण्याची संधी राहतेच. पण, आगामी ॲडलेड कसोटीच्या (Adelaide Test) बाबतीत मात्र काहीसं वेगळं बोललं जातंय. दिवस – रात्र खेळवली जाणारी ही कसोटी मालिकेचं भवितव्य ठरवेल असं जाणकारांना वाटतंय. एकीकडे आहेत दिवस – रात्र कसोटींत विजयाची टक्केवारी ९१ टक्क्यांच्या वर असलेला ऑस्ट्रेलियन संघ. तर दुसरीकडे आहे फक्त अशा ४ कसोटींचा अनुभव असलेला भारतीय संघ. (Border Gavaskar Trophy)
दिवस – रात्र कसोटीची खेळ वेगळाच असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. म्हणजे इथं संध्याकाळचा संधीप्रकाश असतानाची वेळ फलंदाजांसाठी आव्हानात्मक असते. आणि पहिल्या दिवशीच्या तुलनेत खेळपट्टी दुसऱ्या दिवसापासून तेज गोलंदाजांना जास्त सहाय्य करते. त्यामुळे एकदा का कसोटी दुसऱ्या डावांत गेली की, नेमक्या किती धावा होतील हे सांगणं काहीसं कठीण होऊन बसतं. आता तर ॲडलेडमध्ये (Adelaide Test) पहिल्या दिवशी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या दिवशीच खेळपट्टी गोलंदाजांना साथ द्यायला लागेल अशी शक्यता आहे. (Border Gavaskar Trophy)
(हेही वाचा – Maharashtra CM Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वाजता मुंबईत येणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक)
ऑस्ट्रेलियन संघ आतापर्यंत २२ दिवस-रात्र सामने खेळला आहे, यातील १२ मायदेशात. आणि त्यातील फक्त एक त्यांनी गमावली आहे. याउलट भारतीय संघ परदेशात एकमेव दिवस – रात्र कसोटी खेळलाय ती २०२० मध्ये ॲडलेड इथंच. आणि दुसऱ्या डावांत भारतीय फलंदाजी ३६ धावांत कोसळली होती. सुरुवातीला व्यक्त केलेली भीती ती हीच. दुसरा डाव कमालीचा आव्हानात्मक असू शकतो. गुलाबी चेंडूचा खेळाडूंवर होणारा परिणाम हा असा आहे. पहिल्या डावांत ५३ धावांची आघाडी मिळवलेला भारतीय संघ दुसऱ्या डावांत ३६ मध्येच सर्वबाद झाला. (Border Gavaskar Trophy)
गुलाबी चेंडू फलंदाजांच्या मनात भीती आणि संभ्रम निर्माण करतो. आताच्या संघातील विराट, अश्विन आणि बुमराह या खेळाडूंनाच ती कसोटी खेळण्याचा अनुभव आहे. बुमराहने त्या कसोटीत एखादा फूट चेंडू मागेच टाकला होता. ती चूक त्यालाही सुधारावी लागेल. आणि पर्थमध्ये भारतीय संघ मिचेल स्टार्कला जितक्या आरामात खेळला तितकी सोपी परीक्षा ॲडलेडमध्ये असणार नाही. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाकडे संधी असेल या कसोटीत वर्चस्व गाजवून मालिकेत पुनरागमन करण्याची. तर भारताला मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची संधी मिळेल. म्हणूनच ही कसोटी महत्त्वाची असेल. (Border Gavaskar Trophy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community