Ind vs Pak, Asia Cup Junior Hockey : आशिया चषक ज्युनिअर हॉकीत पाकिस्तानचा पराभव करत भारताला सलग तिसरं विजेतेपद

Ind vs Pak, Asia Cup Junior Hockey : अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचा ५-३ ने पराभव केला.

62
Ind vs Pak, Asia Cup Junior Hockey : आशिया चषक ज्युनिअर हॉकीत पाकिस्तानचा पराभव करत भारताला सलग तिसरं विजेतेपद
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या युवा हॉकी संघाने सलग तिसऱ्यांदा आशियाई ज्युनिअर हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावताना पाकिस्तानचा ५-३ ने पराभव केला. मस्कत इथं झालेल्या अंतिम फेरीत भारतातचं वर्चस्व होतं. २००४ पासून भारतीय ज्युनिअर संघाने मिळवलेलं हे पाचवं विजेतेपद आहे. यापूर्वी २००४, २००८, २०१५ आणि २०२३ मध्ये हे विजेतेपद पटकावलं होतं. २०२१ साली कोव्हिडच्या साथीमुळे स्पर्धा रद्द करावी लागली होती.

अंतिम सामन्यात अरिजीत सिंग हुदालचे ४ गोल निर्णायक ठरले. यातील ३ त्याने पेनल्टी कॉर्नरवर केले. तर उर्वरित एक मैदानी गोल होता. संघासाठी पाचवा गोल दिलराज सिंगने केला. तर पाकिस्तानकडून सुफयान खान आणि हन्नान शहीद यांनी मिळून तीन गोल केले. या विजयाबरोबरच युवा संघाने २०२५ च्या युवा विश्वचषकातील आपलं स्थान पक्कं केलं आहे. (Ind vs Pak, Asia Cup Junior Hockey)

(हेही वाचा – Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेडची दिवस – रात्र कसोटीच या मालिकेचं भवितव्य ठरवेल?)

भारतीय संघाने बलाढ्य मलेशियाचा २-१ ने पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. स्पर्धेत भारत विजेता तर पाकिस्तानचा संघ उपविजेता ठरला आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत जपाने मलेशियाचा २-१ ने पराभव केला. भारत, पाकिस्तान सामन्यात खरंतर पाकिस्तानने तिसऱ्याच मिनिटाला मैदानी गोल करत आघाडी मिळवली होती. पण, भारतीय खेळाडू गडबडले नाहीत आणि त्यांनी आक्रमण करत पेनल्टी कॉर्नर मिळवला. त्यावर अरिजीत सिंगने भारताचा पहिला गोल केला. तिथून पुढे मग भारताकडेच आघाडी राहिली. (Ind vs Pak, Asia Cup Junior Hockey)

(हेही वाचा – Maharashtra Oath Ceremony: ११ डिसेंबरला उर्वरित मंत्र्याचा शपथविधी होणार, अजित पवारांची माहिती)

अरिजीतनेच भारताचा दुसरा गोल अठराव्या मिनिटाला केला आणि भारताकडे २-१ अशी आघाडी आली. आणखी एकाच मिनिटांत दिलराज सिंगने संघाचा तिसरा गोल केला आणि भारताकडे ३-१ अशी आघाडी आली. पाकिस्तानने ३० व्या मिनिटाला ही आघाडी २-३ अशी थोडी कमी केली. मध्यंतराला हीच स्थिती राहिली. पण, पाकिस्तान संघावरील दडपण वाढत होतं. (Ind vs Pak, Asia Cup Junior Hockey)

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis : मुंबईत घर नाही, एकही कार नावावर नाही असा मुख्यमंत्री.. किती आहे संपत्ती ?)

मध्यंतराला खेळ सुरू झाला तेव्हा पाकिस्ताने निकराचा प्रयत्न करत ३-३ अशी बरोबरी मिळवली होती. पण, ४७ व्या मिनिटाला अरिजीतने पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल करत भारताचं वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित केलं. सामन्याची शेवटची १० मिनिटं तर भारतानेच चेंडू खेळवत ठेवला होता आणि पाकिस्तानवरील दडपण त्यांनी जराही कमी होऊ दिलं नाही. उलट अरिजीतने आणखी एक गोल करत भारताला ५-३ असा विजय मिळवून दिला. (Ind vs Pak, Asia Cup Junior Hockey)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.