U19 T20 Asia Cup : हरवंश पानगलियाची धोनीसारखीच मागे न पाहता यष्ट्यांवर फेक, सोशल मीडियाला झाली माहीची आठवण

युवा टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने मोठा विजय मिळवला आहे.

87
U19 T20 Asia Cup : हरवंश पानगलियाची धोनीसारखीच मागे न पाहता यष्ट्यांवर फेक, सोशल मीडियाला झाली माहीची आठवण
U19 T20 Asia Cup : हरवंश पानगलियाची धोनीसारखीच मागे न पाहता यष्ट्यांवर फेक, सोशल मीडियाला झाली माहीची आठवण
  • ऋजुता लुकतुके

सध्या युएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक टी-२० स्पर्धेत (U19 T20 Asia Cup) भारताचा यष्टीरक्षक हरवंश पानगलियाची एक फेक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यष्टींकडे न बघता हरवशने केलेली ही फेक लोकांना धोनीची आठवण करून गेली. संयुक्त अरब अमिराती विरुद्धच्या या सामन्यात क्षेत्ररक्षकाने पाठवलेला एक दिशाहिन फेक हरवंशने (Harvansh Pangalia) पाठमोरी अडवली. यष्ट्यांकडे न बघता चेंडू मागे फेकला.

महेंद्रसिंग धोनीही (MS Dhoni) अशा प्रेरणादायी अविष्कारांसाठी ओळखला जायचा. त्याने अशाच पद्धतीने फलंदाजला बाद केलं होतं. पण, हरवंशला यष्ट्यांचा वेध घेऊनही फलंदाजाला बाद करता आलं नाही. कारण, तोपर्यंत तो क्रीझमध्ये पोहोचला होता. हरवंशचे (Harvansh Pangalia) प्रयत्न आधी पाहूया. (U19 T20 Asia Cup)

(हेही वाचा – amravati express : जाणून घ्या अमरावती एक्सप्रेसचा रोमांचक इतिहास)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री… कशी आहे देवेंद्र फडणवीसांची राजकीय कारकीर्द)

हरवंशकडे (Harvansh Pangalia) आलेला चेंडू दिशाहीन होता. हा सामना मात्र भारताने आरामात जिंकला. सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवताना हा सामना १० फलंदाज राखून जिंकला. त्याचबरोबर युवा आशिया चषकात (U19 T20 Asia Cup) उपान्त्य फेरीतही मजल मारली आहे. संयुक्त अरब अमिराती संघाने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. पण, त्यांचा अख्खा संध १३७ धावांत सर्वबाद झाला. युद्धजीत गुहाने ३ बळी घेत मोलाची कामगिरी केली.

तर यानंतर आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) आणि वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) यांनी १७ व्या षटकांत ही धावसंख्या पार करून भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. आयपीएल लिलावात युवा करोडपती ठरलेला वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) ४६ चेंडूंत ७६ धावा ठोकल्या. आयुष म्हात्रेनंही ६७ धावा केल्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.