रस्त्यावर चालताना नियम पाळा, अपघात टाळा; Nitin Gadkari यांचे संसदेत आवाहन

68
रस्त्यावर चालताना नियम पाळा, अपघात टाळा; Nitin Gadkari यांचे संसदेत आवाहन
  • प्रतिनिधी 

रस्त्यावर होणारे अपघात अतिशय काळजीचा विषय आहे. मात्र विविध योजना राबवून देखील अपघाताच्या आकडेवारीमध्ये काहीच फरक पडला नसल्याची खंत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी संसदेत बोलताना व्यक्त केली. यावेळी यांनी आपल्या अपघाताचा अनुभवही सांगितले. ते म्हणाले महाराष्ट्र राज्याचा विरोधी पक्षनेता असताना झालेला अपघात कधीही विसरू शकत नाही. तुटलेल्या पायाचे दुःख काय असतं ते माहित आहे, यामुळे लोकांनी रस्त्यावर चालताना नियमाचे पालन करावे, असं मनापासून वाटत असल्याचे देखील त्यांनी बोलून दाखविले.

(हेही वाचा – Ind vs Pak, Asia Cup Junior Hockey : आशिया चषक ज्युनिअर हॉकीत पाकिस्तानचा पराभव करत भारताला सलग तिसरं विजेतेपद)

लोकसभेत रस्ते अपघातांवर काही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना गडकरींनी (Nitin Gadkari) उत्तर दिले. ते म्हणाले, लोक कायद्याचा आदर करत नाहीत, कायद्याची भीतीही त्यांना नाही, ही सर्वात मोठी समस्या आहे. हेल्मेट न घातल्याने दरवर्षी 30 हजार जणांचा मृत्यू होतो. रस्त्यांच्या नियमांचे पालन व्हायला हवे. ते होत नसल्याने अपघात अधिक होतात. मी स्वतः भोगले आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता असताना अपघातात माझा पाय चार ठिकाणी तुटला होता. मी याबाबत संवेदनशील आहे. हे स्वीकारण्यात मला संकोच वाटत नाही, तर दुःख होत आहे. आम्ही प्रयत्न करूनही दीड लाखांचा मृतांचा आकडा यावेळी 1 लाख 68 हजार झाला आहे. लोक आणि समाजाचे सहकार्य तसेच मीडियाच्या मदतीशिवाय यात बदल होणार नाही. आम्ही दंडाची रक्कम वाढविली.

(हेही वाचा – ATM Shutting Down ? बँका आपली एटीएम केंद्र का बंद करत आहेत?)

रोड सेफ्टी बिलामध्ये सगळे केले. पण तरीही लोक नियमांचे पालनही करत नाहीत. यामध्ये राज्य आणि केंद्राचीही भूमिका आहे. पण कुणावर आरोप करत नाही. मी स्वत:ला दोषी मानतो. आम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू, असे गडकरी म्हणाले.
देशात पाच लाख अपघातांमध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होत होता. पण अनेक उपाययोजना करूनही हा आकडा यावर्षी एक लाख 68 हजारांवर गेला आहे. हे लोक कोणत्याही दंगलीत किंवा लढाईल मेलेले नाहीत, असे सांगताना गडकरी यांनी सर्व खासदारांना आवाहनही केले. प्रत्येक खासदारांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती नियुक्त केली आहे. तब्बल 40 हजार ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. ही खूप गंभीर समस्या आहे. आपल्या जिल्ह्यात ब्लॅक स्पॉट आणि त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन गडकरींनी (Nitin Gadkari) केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.