यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ Vikram Sampath यांना जाहीर

139

यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ (Swatantrya Veer Savarkar Award) ज्येष्ठ सावरकर अभ्यासक विक्रम संपत (Vikram Sampath) यांना जाहीर करण्यात आला आहे. हा ‘पुरस्कार आयाम’तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी दिला जातो. रविवार दि. ८ डिसेंबर रोजी गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ‘गोदावरी संवाद २०२४’ या कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (CP Sandeep Karnik) यांच्या हस्ते होणार आहे. तर जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक आयामचे अध्यक्ष डॉ. भरर्त केळकर यांच्या हस्ते विक्रम संपत यांना पुरस्कार दिला जाणार आहे. (Vikram Sampath)

(हेही वाचा – Elon Musk : एलॉन मस्कची एकूण संपत्ती ३५० अब्ज अमेरिकन डॉलरच्या पार, कशामुळे झाली एवढी वाढ?)

पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आणि ‘गोदावरी संवाद’ (Godavari Samvad) कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज मंडळी आयाम-नाशिकच्या मंचावर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये प्रसिद्ध पत्रकार रुबिका लियाकत व आनंद नरसिंहन, लेखिका आणि सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर शेफाली वैद्य, लेखक अभिजित जोग, प्रसिद्ध लेखिका आणि अभ्यासक वैशाली करमरकर, ब्लॉगर ओंकार दाभाडकर, लेखक व अभिनेते दिपक करंजीकर आणि अॅड. आशिष सोनावणे अशा विविध क्षेत्रातील दिग्गज अभ्यासक वेगवेगळ्या विषयांवर आपले अभ्यासपूर्ण मत मांडणार आहेत. या कार्यक्रमासाठी शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयामतर्फे करण्यात आले आहे.

 हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.