Bangladesh Violence: हिंदूवर अत्याचार सुरूच; २०० कुटुंबांनी घर सोडले

144
बांगलादेशात हिंदूंवरील (Bangladesh Hindu Atrocities) हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. युनूस सरकारच्या (Yunus government) दाव्यानंतरही अल्पसंख्याकांना (Bangladesh Hindu Minority) लक्ष्य केले जात आहे. सुमनगंज जिल्ह्यात कट्टरतावाद्यांच्या जमावाने हिंदूंच्या (Bangladesh Hindu) घरांवर हल्ले केले.  (Bangladesh Violence)
जमावाने बुधवार, ०४ डिसेंबर रोजी हिंदूंच्या घरांवर हल्ले केले. यामध्ये एका हिंदू तरुणाने फेसबुक पोस्टमध्ये ईशनिंदा केल्याचा आरोप झाल्यानंतर हा हिंसाचार झाला. बेकायदेशीर जमावाने १०० हून अधिक हिंदूंच्या घरांची तोडफोड केली. प्रार्थनास्थळेही सोडली नाहीत. टाइम ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, अलीकडेच २०० हून अधिक हिंदू कुटुंबे स्थलांतरित (Bangladesh Hindu families migrated) झाली आहेत.
(हेही वाचा – Delhi Assembly Election : दिल्लीतील राखीव मतदारसंघावर BJP चा फोकस)
या आरोपांनंतर पोलिसांनी आकाश दास (Akash Das) (२०) याला सुमनगंजमधील मंगळारगाव येथून ईशनिंदेच्या आरोपाखाली अटक केली. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी प्रथमच जाहीर भाषण दिले आणि युनूस सरकारवर अल्पसंख्याकांचा, विशेषत: हिंदूंचा जाणूनबुजून नरसंहार केल्याचा आरोप केला.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.