- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील उद्यान, मैदान आणि मनोरंजन मैदानांची वार्षिक देखभालीच्या कामांसाठी मागवलेल्या निविदा पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. महापालिकेच्यावतीने जिथे २४ विभाग कार्यालयांच्या हद्दींमध्ये स्वतंत्र कंत्राटदारांची निविदा काढली जाते तिथे तीन परिमंडळांसाठी स्वतंत्र निविदा काढली आणि उर्वरीत वॉर्डांसाठी प्रत्येकी कंत्राटदारांची निवड करण्यासाठी एकूण १६ निविदा काढल्या होत्या. मात्र, नियमबाह्य देण्यात आलेल्या कंत्राट कामांतील तीन परिमंडळांची कामे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे परिमंडळ निहाय कंत्राट रद्द करण्यात आल्याने पुन्हा एकदा वॉर्डांसाठी स्वतंत्र निविदा मागवण्यात येणार आहे. हिंदुस्थान पोस्टने ३० सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईतील उद्यान, मैदानांच्या देखभाल कंत्राटात संगनमत? महापालिका प्रशासन आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे करेल का? या मथळ्याखाली सर्वप्रथम वृत्त प्रकाशित करत हा प्रकार उघडकीस आणला होता. (BMC)
(हेही वाचा – BMC : मुंबईतील उद्यान, मैदानांच्या देखभाल कंत्राटात संगनमत? महापालिका प्रशासन आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे करेल का?)
मुंबईतील उद्यान, मैदान, क्रीडांगण, मनोरंजन मैदान यांची वार्षिक देखभाल करण्यासाठी यापूर्वी नेमलेल्या कंत्राटदारांची मुदत संपुष्टात येत असल्याने महापालिकेच्यावतीने सुमारे २०० कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा निमंत्रित केल्या. परंतु आजवर २४ वॉर्डकरता २३ कंत्राटदारांची निवड केलेली जात असताना उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी काही ठराविक कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून तीन परिमंडळांसाठी स्वतंत्र निविदा काढल्या आणि उर्वरीत वॉर्डांसाठी स्वतंत्र निविदा काढली. यापूर्वी परिमंडळ एक मधील ए, बी, सी आणि ई यांच्यासाठी स्वतंत्र निविदा काढली जात होती, परंतु याठिकाणी वॉर्डांसाठी स्वतंत्र कंत्राटदाराची निविदा न मागवता सर्व वॉर्डांसाठी एक म्हणजे परिमंडळ एक एकच निविदा काढली, तसेच एच पूर्व, एच पश्चिम आणि के पूर्व या परिमंडळ ३, एल, एम पूर्व अणि एम पश्चिम या परिमंडळ ५ मधील वॉर्डांसाठी स्वतंत्र निविदा न काढता परिमंडळ निहाय कंत्राटदारांची निवड करण्यासाठी निविदा काढली. (BMC)
(हेही वाचा – Bangladesh Violence: हिंदूवर अत्याचार सुरूच; २०० कुटुंबांनी घर सोडले)
तीन परिमंडळ वगळता उर्वरीत १६ वॉर्डांमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये कंत्राटदारांनी महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा २४ ते ३८ टक्के कमी दराने बोली लावत काम मिळवले होते, तर परिमंडळांसाठीच्या निविदांमध्ये कंत्राटदारांनी १२ ते १६ टक्के कमी दराने बोली लावली होती. त्यामुळे जिथे वॉर्डांमध्ये ३८ टक्के कमी दरात काम करायला कंत्राट कंपन्या तयार असताना, परिमंडळांसाठीच्या कामांमध्ये १२ ते १६ टक्के कमीची बोली लावली. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान संभवते अशाप्रकारचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने सर्वप्रथम दिले होते. या वृत्तानंतर महापालिकेने १६ विभागांसाठी काढलेल्या स्वतंत्र निविदांप्रमाणे कंत्राटदारांना कामे बहाल करून परिमंडळ निहाय कंत्राटदारांची कामे रोखून ठेवली होती. दरम्यान, आचारसंहिता असल्याने याबाबत निर्णय होऊ शकला नव्हता, परंतु दोनच दिवसांपूर्वी तीन परिमंडळांच्या कंत्राट कामे रद्द करण्याचा निर्णय घेतल आहे. त्यामुळे या परिमंडळांमधील सर्व वॉर्डासाठी आता स्वतंत्र निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. महापालिका प्रशासनाने परिमंडळ निहाय निविदा काढण्याच्या कामांची चौकशी करून संगनमत करून मिळवलेल्या कामांचीही चौकशी केल्यास सत्य समोर येईल आणि महापालिकेचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येऊ शकणारे आहे, अशाप्रकारची बाब हिंदुस्थान पोस्टने ३० सप्टेंबर २०२४ रोजी मांडून प्रशासनाचे लक्ष याकडे वेधले होते. त्यामुळे या कामांची ही चौकशी करेपर्यंत परिमंडळांच्या कामांना स्थगिती दिली जावी, असेही नमुद केले होते. (BMC)
(हेही वाचा – Jitendra Awhad यांना आमदारकीचा राजीनामा देण्याचा सल्ला लोकांनी का दिला?)
परिमंडळ १ : आर शाह सिव्हिल इंजिनिअरिंग : १०.३२ कोटी (-१२.६०० टक्के)
परिमंडळ ३ : हिरावती एंटरप्राइजेस : २.३० कोटी (-१५ .३०० टक्के)
परिमंडळ ०५ : डी बी इन्फ्राटेक : २०.३५ कोटी (१२.५४० टक्के)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community