Bombay High Court : भविष्याचा विचार करून मुंबईचा विकास करा; उच्च न्यायालयाची टिप्पणी

94
Bombay High Court : भविष्याचा विचार करून मुंबईचा विकास करा; उच्च न्यायालयाची टिप्पणी
Bombay High Court : भविष्याचा विचार करून मुंबईचा विकास करा; उच्च न्यायालयाची टिप्पणी

झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) उच्च न्यायालयाला (Bombay High Court) या मुद्द्यात लक्ष घालण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. या याचिकेवर गुरुवारी (5 डिसेंबर) न्यायालयात सुनावणी सुरू होती.

हेही वाचा- Fake ED Team : गुजरातमधील गांधीधाममध्ये बोगस ईडी पथकाला अटक, 1 महिलेसह 12 आरोपी ताब्यात

भविष्यात हे शहर कसे असेल, ही दृष्टी ठेवून मुंबईचा (Mumbai) विकास करण्यात यावा. मोकळ्या जागांचे संवर्धन करावे, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने (Bombay High Court) केली. पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत, याचा विचार करायला हवा. आपल्याला अधिक हरित पट्टे आवश्यक आहेत. खेळण्यासाठी मैदाने हवी आहेत. मुंबईत अनेक हुशार लोक आहेत, ते कुठे जातील? जर मुंबईत ऑलिम्पिकचे आयोजन करायचे असेल तर कुठे जाणार? असा सवाल उच्च न्यायालयाने (Bombay High Court) केला.

हेही वाचा- Jammu and Kashmir मध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक

महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला संगितले की, एसआरए सर्व झोपडपट्टीधारकांची माहिती घेत असून त्यांच्या समस्यांमविषयी आणि त्यावर राज्य सरकारकडे असलेल्या तोडग्याबाबत तक्ता तयार करत आहे. ते काम करण्यासाठी काही दिवसांनी मुदत द्यावी, अशी विनंती सराफ यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत पुढील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी ठेवली. (Bombay High Court)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.