विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेत असतात. सरकार याबाबत निर्णय घेत नाही. अध्यक्ष जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. लोकसभेत जेव्हा १० वर्षे विरोधी पक्षनेतेपद (Leader of Opposition) नव्हते, तरीदेखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता, त्याला विरोधी पक्षनेत्याप्रमाणे सर्व अधिकार लोकसभेने दिले होते. तसेच जिथे जिथे विरोधी पक्षनेता असतो, तिथे तिथे त्यांना घेतले गेले होते. अध्यक्षांनी जर विरोधी पक्षनेता देण्यास मान्यता दिली तर आम्हाला हरकत नसेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – Bombay High Court : भविष्याचा विचार करून मुंबईचा विकास करा; उच्च न्यायालयाची टिप्पणी)
मुख्यमंत्रीपदी शपथ (oath ceremony maharashtra) घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी विरोधकांचे संख्याबळ कमी आहे. जर विरोधकांच्या आवाजाला महत्त्व देणार असाल, तर विरोधी पक्षनेते पदासाठी पाठिंबा देणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर फडणवीस यांनी महायुतीची भूमिका व्यक्त केली.
‘खून के प्यासे’ राजकारण नाही
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे. इथे दक्षिणेतील राजकारण्याप्रमाणे ‘खून के प्यासे’ असे राजकारण केले जात नाही. आमच्याकडे भक्कम बहुमत असले, तरी आम्ही विरोधकांच्या आवाजाला दाबणार नाही, त्यांचा आवाज तेवढाच महत्त्वाचा आहे. यावेळी पूर्णपणे वेगळे राजकारण असेल. मी आधीच सांगितले की, मला बदल्याचे नाही, तर बदल दाखवेल, असे राजकारण करायचे आहे. विरोधकांची संख्या कमी आहे, हे खरे आहे. पण विरोधकांच्या आवाजावर किंवा त्यांच्या संख्येवर आम्ही मूल्यमापन करणार नाही. त्यांनी योग्य विषय मांडले. तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान देऊ. स्थिर सरकारचे पाच वर्ष पाहायला मिळतील. जनतेने प्रचंड असे बहुमत दिले आहे. त्यामुळे जनतेला स्थिर सरकार देणे ही आमची जबाबदारी आहे.”
राजकीय संवाद संपलेला नाही
“२०१९ ते २०२२ च्या मध्यापर्यंत राज्याला जे वेगवेगळे बदल दिसले, तसे धक्के यापुढे लागू नयेत, ही जनतेची अपेक्षा आम्ही पूर्ण करू. आज शपथविधीचे आमंत्रण सर्वच माजी मुख्यमंत्र्यांना दिले होते. तसेच राज ठाकरे यांनाही शपथविधीचे आमंत्रण मी स्वतः फोन करून दिले होते. मात्र त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाहीत. महाराष्ट्रातला राजकीय संवाद कधीही संपलेला नाही”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community