-
ऋजुता लुकतुके
ॲडलेड कसोटीत यशस्वी जैस्वालच्या बरोबरीने के. एल. राहुलनेच सलामीला यावं असा मतप्रवाह आता वाढत आहे. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीनेही आता या चर्चेत उडी घेतली आहे. राहुलच्याच बाजूने कौल दिला आहे. त्याचं कारण मात्र थोडं वेगळं आहे. रोहितला ऑस्ट्रेलियात येऊन जेमतेम १५ दिवस झालेत. त्याला निदान एखादी कसोटी खेळेपर्यंत इथल्या खेळपट्टीचा अंदाज येणार नाही. अशावेळी जमलेली सलामची जोडी फोडू नये असं शास्त्रीला वाटतं. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा- Bombay High Court : भविष्याचा विचार करून मुंबईचा विकास करा; उच्च न्यायालयाची टिप्पणी)
के. एल. राहुल पहिल्या कसोटीपूर्वी दडपणाखाली होता. पण, या कसोटीत त्याने पहिल्या डावांत २७ आणि दुसऱ्या डावांत ७७ धावांची खेळी केली. महत्त्वाचं म्हणजे दोन्ही डावांत यशस्वी जैस्वाल सोबत त्याची जोडी जमली. दुसऱ्या डावांत दोघांनी २०१ धावांची सलामी संघाला करून दिली. त्यामुळे ही जोडी आता फोडू नये असंच मत रवी शास्त्री यांनी आयसीसी रिव्ह्यू कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)
‘मला वाटतं सलामीची जोडी इतक्यात बदलू नये. रोहितला ऑस्ट्रेलियात येऊन तयारीलाही पुरेसा वेळ मिळालेला नाही. तो जेमतेम एक सरावाचा सामना खेळला आहे. अशावेळी एकदम त्याला सलामीला पाठवू नये. रोहीत ५ किंवा ६ क्रमांकावर खेळू शकतो. तेच योग्य राहील,’ असं शास्त्री म्हणाले. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)
(हेही वाचा- Fake ED Team : गुजरातमधील गांधीधाममध्ये बोगस ईडी पथकाला अटक, 1 महिलेसह 12 आरोपी ताब्यात)
त्याचवेळी शुभमन गिल दुखापतीतून बरा झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. गिल कॅनबेरा इथं सराव सामन्यात खेळला आणि त्याने अर्धशतकही ठोकलं. त्यामुळे भारतीय फलंदाजी आता भक्कम झालीय असं रवी शास्त्री यांना वाटतं. ‘गिल संघात परतलाय ही चांगलीच गोष्ट आहे. शिवाय तो फॉर्मातही आहे. गेल्या १० वर्षांत भारताच्या ज्या संघांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे, त्यापैकी ही सगळ्यात बलवान फलंदाजांची फळी आहे. कारण, या फळीकडे ऑस्ट्रेलियात आणि जगात कुठेही खेळण्याचा अनुभव आहे. तेव्हा ही मालिका नक्कीच चुरशीची होईल. भारतीय संघ कमी पडणार नाही,’ असं शास्त्री यांनी बोलून दाखवलं. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)
ॲडलेड कसोटीसाठी रोहित आणि शुभमन परतल्यामुळे आता ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांना बाहेर बसावं लागेल. तर एकमेव फिरकीपटू म्हणून वॉशिंग्टन सुंदरलाच पसंती मिळेल असं दिसत आहे. (Border Gavaskar Trophy, Adelaide Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community