Sambhal Violence : संभलमध्ये लावणार दंगलखोरांचे पोस्टर्स ; ६ डिसेंबर आणि शुक्रवारच्या पार्श्वभूमीवर पोलीस हाय अलर्टवर!

82
Sambhal Violence : संभलमध्ये लावणार दंगलखोरांचे पोस्टर्स ; ६ डिसेंबर आणि शुक्रवारच्या पार्श्वभूमीवर पोलीस हाय अलर्टवर!
Sambhal Violence : संभलमध्ये लावणार दंगलखोरांचे पोस्टर्स ; ६ डिसेंबर आणि शुक्रवारच्या पार्श्वभूमीवर पोलीस हाय अलर्टवर!

उत्तर प्रदेशातील (up) संभल येथील हिंसाचाराच्या (Sambhal Violence) आरोपींविरोधात पोलीस-प्रशासन कडक भूमिका घेत आहे. जिल्ह्यात अशांतता आणि तोडफोड करणाऱ्यांचे पोस्टर्स आता शहरातील चौकाचौकात लावण्यात येणार आहेत. संभल हिंसाचारात जाळपोळ आणि तोडफोडीमुळे एक कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाजही पोलिसांनी व्यक्त आहे. हे नुकसानही गैरप्रकार करणाऱ्यांकडून वसूल केले जाईल. असे त्यांनी सांगितले आहे. (Sambhal Violence)

हेही वाचा- Bombay High Court : भविष्याचा विचार करून मुंबईचा विकास करा; उच्च न्यायालयाची टिप्पणी

या सगळ्यात, 6 डिसेंबर असल्याने संभलमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी ढाचा पाडण्यात आला. हिंदू संघटना ‘शौर्य दिवस’ साजरा करतात, तर मुस्लिम संघटना याविरोधात निषेध नोंदवतात. अशा परिस्थितीत शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसराचे छावणीत रुपांतर झाले आहे. (Sambhal Violence)

हेही वाचा- Fake ED Team : गुजरातमधील गांधीधाममध्ये बोगस ईडी पथकाला अटक, 1 महिलेसह 12 आरोपी ताब्यात

जिल्हा महादंडाधिकारी राजेंदर पेनसिया (Rajendra Pancia) यांनी सांगितले, की संभलमधील हिंसेत सहभागींचे फलक आजच सगळीकडे लावण्यात येतील. मशिदीतील सर्व्हेवरून झालेल्या हिंसेशी संबंधित ४०० लोकांची ओळख तपास यंत्रणांनी केली आहे. तसेच, शांतता समितीची बैठकही आयोजित केली असून, सर्व परिस्थितीवर बैठकीत चर्चा करण्यात येईल. ज्यांना अटक केली आहे, त्यांचे फलक लावली जाणार नाहीत. (Sambhal Violence)

हेही वाचा-Jammu and Kashmir मध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक 

हिंसेशी संबंधित उर्वरित आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिष्णोई (Krishna Kumar Bishnoi) यांनी दिली. आतापर्यंत ३४ जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसेत सहभागी ८३ लोकांची नावे समोर आली आहेत. आरोपींची ४०० छायाचित्रे एकत्र करण्यात आली आहेत. हिंसेत एक कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. ट्रान्सफॉर्मर जाळणे, कॅमेऱ्यांची तोडफोड, वाहनांची जाळपोळ आदींचा यात समावेश आहे. दंगलखोरांकडूनच त्याची वसुली केली जाईल. (Sambhal Violence)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.