Harbhajan – Dhoni Dispute : हरभजन आणि धोनी यांच्यात वादाची ठिणगी नेमकी कुठे पडली?

107
Harbhajan - Dhoni Dispute : हरभजन आणि धोनी यांच्यात वादाची ठिणगी नेमकी कुठे पडली?
Harbhajan - Dhoni Dispute : हरभजन आणि धोनी यांच्यात वादाची ठिणगी नेमकी कुठे पडली?
  • ऋजुता लुकतुके

महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग यांचं एकमेकांशी पटत नसल्याच्या चर्चा दोघं एकत्र खेळत होते तेव्हापासून रंगायच्या. आता हरभजनने एका मुलाखतीत ते अजूनही एकमेकांशी बोलत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दोघं मागच्या १० वर्षांत एकमेकांशी बोलले नसल्याचंच हरभजनने सांगितलं आहे. २०१८ ते २०२० या कालावधीत हरभजन चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. पण, तेव्हाही दोघं फक्त आणि फक्त क्रिकेटवरच बोलायचे असं हरभजनने स्पष्ट केलं आहे.  (Harbhajan – Dhoni Dispute)

(हेही वाचा- Border Gavaskar Trophy, Adelaide Test : ॲडलेडमध्ये दुसऱ्या कसोटीसाठी कसं आहे हवामान? पावसाचा काय अंदाज?)

‘नाही. मी धोनीशी बोलत नाही. आम्ही जेव्हा एकत्र खेळत होतो, तेव्हा शेवटचं बोललो असू. पण, तेव्हाही क्रिकेटबद्दलच बोलायचो. एरवी आमच्याच काहीही बोलाचाली नाही. याचं कारण मला ठाऊक नाही. कदाचित धोनीकडे एखादं कारण असेल. माझ्याकडे नाही,’ असं हरभजन पुढे म्हणतो. क्रिकेटनेक्स्ट वेबसाईटशी बोलताना हरभजन पुढे म्हणतो, ‘मी दोनदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने काहीच उत्तर दिलं नाही. पुढे मग काहीच संभाषण झालं नाही.’ (Harbhajan – Dhoni Dispute)

कुठलंही नातं हे दोन्ही बाजूंनी असावं लागतं. त्यामुळे माझ्याकडून नाही. पण, धोनीकडून आमचं नातं तुटलं असं शेवटी हरभजन सिंग म्हणाला. हरभजन सिंग भारताकडून १०३ कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने ४१७ बळी मिळवले आहेत. त्याच्या नावावर दोन कसोटी शतकंही आहेत. २०११ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ च्या चॅम्पियन्स करंडक विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. या दोन्ही वेळी भारतीय नेतृत्व महेंद्रसिंग धोनीनेच केलं होतं. (Harbhajan – Dhoni Dispute)

(हेही वाचा- Bombay High Court : भविष्याचा विचार करून मुंबईचा विकास करा; उच्च न्यायालयाची टिप्पणी)

पण, हरभजनच्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं बोललं जातं. २०२१ मध्ये हरभजनने निवृत्ती स्वीकारली. पण, तो शेवटचा कसोटी सामना २०१५ मध्येच खेळला होता. आपल्याला संघातून का वगळलं याचं ठोस कारण दिलं गेलं नसल्याचं त्याने मीडियाशी बोलून दाखवलं होतं. तिथे दोघांमध्ये वाद सुरू झाला असावा. (Harbhajan – Dhoni Dispute)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.