राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झालं आहे. या नव्या सरकारमध्ये राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आला आहे. म्हणजेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील. नव्या सरकारने 5 डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर शपथ घेतली. (Keshav Upadhyay)
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राज्यातील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि कलाकार मंडळीही सहभागी झाले होते. परंतु या सोहळ्यासाठी विरोधी पक्षातील एकही नेता उपस्थित नव्हता. शपथविधी सोहळ्यासाठी व्यक्तिगत निमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे, शरद पवार गैरहजर राहिले. त्यावरून हीच तर महाराष्टविरोधी कोती मनोवृत्ती अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी टोला लगावला आहे. ट्विट करत त्यांनी हा निशाणा साधला आहे.
हेही वाचा-Bombay High Court : भविष्याचा विचार करून मुंबईचा विकास करा; उच्च न्यायालयाची टिप्पणी
केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी ट्विट करत म्हणाले, ‘आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार शपथविधी झाला. या समारंभापासून व्यक्तिगत आमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेते गैरहजर राहिले. हा लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा शपथविधी होता. लोकशाहीत लोकांनी दिलेला कौल स्वीकारून हे नेते शपथविधीला आले असते तर खरंच या नेत्यांना महाराष्ट्र हिताची व संविधानाची जाण आहे असा अर्थ निघाला असता. महाराष्ट्राचा विकासासाठी आम्ही एक आहोत असा संदेश दिला गेला असता.’
हेही वाचा-Fake ED Team : गुजरातमधील गांधीधाममध्ये बोगस ईडी पथकाला अटक, 1 महिलेसह 12 आरोपी ताब्यात
हिच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती
काल आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून @Dev_Fadnavis यांचा तर @mieknathshinde व @AjitPawarSpeaks यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. या समारंभापासून व्यक्तीगत आमंत्रण देऊनही @uddhavthackeray @PawarSpeaks व कॅाग्रेसचे नेते…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 6, 2024
‘२०१९ मध्ये उध्दव ठाकरे यांनी लोकांचा विश्वासघात करीत मविआसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस व तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. त्यापूर्वीची उदाहरणे आहेत. निवडणुका संपल्या आता विकासासाठी आपण एक आहोत हा संदेश देता आला असता. मात्र पक्षीय स्वार्थापलीकडे आम्ही काहीच पाहू शकत नाही, महाराष्ट्राच्या हिताचा कोरड्या गप्पा मारतो व वेळ आली तर विरोधातच हेच या निमित्ताने या मंडळींनी दाखवून दिले.’ असं सांगत उपाध्ये यांनी २०१९ च्या शपथविधी सोहळ्याची आठवण करून दिली. (Keshav Upadhyay)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community