काँग्रेस खासदार Abhishek Manu Singhvi यांच्या सीटवर नोटांचे बंडल; राज्यसभेत गदारोळ

224
राज्यसभेत काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या सीटवर नोटांचे बंडल
राज्यसभेत काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या सीटवर नोटांचे बंडल

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभा सभागृहात 222 क्रमांकाच्या आसनावर चलनी नोटांचे बंडल आढळून आले. हे आसन काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंगवी यांचे आहे. त्यांच्या जागेवर नोटांचे बंडल आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

(हेही वाचा – Dhoni – Harbhajan Dispute : हरभजन सारखंच आणखी कोणाबरोबर होतं महेंद्र सिंह धोनीचं भांडण?)

सभापतींनी दिले चौकशीचे आदेश

यासंदर्भात सभागृहाला माहिती देताना राज्यसभा सभापती जगदीप धनखड म्हणाले की, गुरुवारी (5 डिसेंबर रोजी) सभागृहाचे कामकाज आटोपल्यानंतर सभागृहाची तपासणी सुरू असताना आसन क्रमांक 222 वर चलनी नोटांचे एक बंडल आढळून आले. हे आसन काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांना देण्यात आले आहे. नोटांचे बंड आढळल्याचे समजताच यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले. धनखड याबाबत सभागृहाला देत असताना काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी खासदाराचे नाव घेऊ नये असा आग्रह केला.

बंडल माझे नाही – अभिषेक मनू सिंघवी

दरम्यान अभिषेक मनू सिंघवी यांनी सदर बंडल आपले नसल्याचे सांगितले. मी राज्यसभेत जाताना फक्त 500 रुपयांची नोट घेऊन जातो. मी पहिल्यांदाच याबद्दल ऐकले. मी दुपारी 12.57 वाजता सभागृहात पोहोचलो आणि दुपारी 1 वाजता सभागृह तहकूब झाले. त्यानंतर, मी दुपारी 1.30 पर्यंत कॅन्टीनमध्ये बसलो. अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांच्यासमवेत आणि संसदेतून बाहेर पडलो असे त्यांनी सांगितले. सिंघवी यांनी या घटनेच्या चौकशीचे स्वागत केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.