Mumbai Crime : साडेतीन कोटींच्या शेअर्स ट्रेडिंग फसवणूक प्रकरणी तिघांना दिव्यातून अटक

184
Mumbai Crime : साडेतीन कोटींच्या शेअर्स ट्रेडिंग फसवणूक प्रकरणी तिघांना दिव्यातून अटक
Mumbai Crime : साडेतीन कोटींच्या शेअर्स ट्रेडिंग फसवणूक प्रकरणी तिघांना दिव्यातून अटक
शेअर बाजारातील गुंतवणुकीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची ३.८१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी तिघांना दिवा आणि मुंब्रा येथून अटक केली . पोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्या आरोपींपैकी सतीश यादव याने एक शेल कंपनी उघडली होती ज्यात तक्रारदाराने त्याच्या बँक खात्यातून दीड कोटी ट्रान्सफर केले होते. (Mumbai Crime)
यादव दिवा येथील बीआर नगर येथे राहण्यास आहे तर अन्य दोन आरोपी विकास मौर्य आणि सचिन चौरसिया हे मुंब्रा आणि दिवा पूर्व येथे राहतात.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७६ वर्षीय तक्रारदार ब्रीच कँडी परिसरात राहतात त्यांचा ऑटोमोबाईल पार्ट्स एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत त्याच्या व्हॉट्सॲपवर मेसेज आला होता असे त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्याने मेसेजमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांना तात्काळ शेअर्स बाजारात गुटवणुकीच्या योजना व्हाट्सअप्पवर येऊ लागल्या. (Mumbai Crime)
सुरुवातीला तक्रारदाराने कमी रक्कम गुंतवली आणि त्यांना मोठा परतावा मिळत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर, त्यांनी १४ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान २८ व्यवहार केले त्यात त्यांनी ३कोटी ८१ लाख विविध खात्यावर हस्तांतरित केले.
 तक्रारदाराने आपले शेअर्स विकण्याचा प्रयत्न केला तेव्हा ब्रोकरने त्याच्या कॉलला प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मुंबईतील मध्य सायबर पोलिस ठाण्यात जाऊन लेखी अर्ज दिला. तपासानंतर पोलिसांनी मे महिन्यात गुन्हा नोंदवला.मध्य सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक मौसमी पाटील यांनी सांगितले की, “तपासादरम्यान, असे आढळून आले की फसवणूक झालेल्या रकमेपैकी दीड कोटी सतीश यादवने स्थापन केलेल्या शील्ड असोसिएट नावाच्या शेल कंपनीच्या खात्यात जमा केले होते. “आरोपीने एयू स्मॉल फायनान्स बँकेत खाते उघडले होते.” अशी माहिती पोलिसांनी दिली. सायबर पोलिसांनी या खात्याचा माग काढत या तिघांना दिवा आणि मुंब्रा येथून अटक करण्यात आली,५ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (Mumbai Crime)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.