South Africa Tourism : दक्षिण आफ्रिका करणार भारतातील सर्वोच्च एअरलाइन्ससोबत भागीदारी

74
South Africa Tourism : दक्षिण आफ्रिका करणार भारतातील सर्वोच्च एअरलाइन्ससोबत भागीदारी

· दक्षिण आफ्रिका आणि भारत ३० वर्षांचे राजनैतिक संबंध आणि लोकशाही साजरी करत असून आर्थिक विकास व धोरणात्मक सहयोगावर भर देत आहेत
· दक्षिण आफ्रिका जागतिक सहयोगाला चालना देऊन जी२० अध्यक्षपदासाठी आपला रोडमॅप आखणार

दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन मंत्री पॅट्रिशिया डे लिले आणि दक्षिण आफ्रिकन टुरिझन सीईओ नोम्बुलेलो गुलिवे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. ते “३० वर्षांचे राजनैतिक संबंध, ३० वर्षांची लोकशाही आणि दक्षिण आफ्रिकेकडून २०२५ मध्ये जी२०चे अध्यक्षपद” या संकल्पनेनुसार दोन्ही देशांमधील संबंधांना चालना देत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील संबंधांवर तसेच लोकशाही मूल्ये आणि आपसातील आदरावर भर देत आहेत. मुंबईतील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री पॅट्रिशिया डे लिले यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील नाते मजबूत करण्यासाठी संभाव्य कोड शेअरिंग भागीदारीसंदर्भात भारतातील सर्वोच्च एअरलाइन्ससोबत सकारात्मक चर्चा करणार असल्याचे सांगितले. (South Africa Tourism)

दक्षिण आफ्रिका आयसीसी टी२० क्रिकेट वर्ल्ड कप २०२७ आयोजित करण्यासाठी तयारी करत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना आकर्षित करण्यासाठी या स्पर्धेचा लाभ घेऊन अनुभवावर आधारित प्रवासाची वाढती मागणी ते पूर्ण करणार आहेत. मंत्री डे लिले यांनी भारतीय प्रवाशांना भेडसावणाऱ्या व्हिसा आणि प्रवासाशी संबंधित आव्हानांवर मात करण्यात केलेल्या प्रगतीला अधोरेखित केले. दक्षिण आफ्रिकेकडून इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन (ईटीए) आणला जाणार असून त्यातून प्रवाशांना आपल्या व्हिसासाठी थेट अर्ज करता येईल. याशिवाय ट्रस्टेड टूर ऑपरेटर स्कीम (टीटीओएस) जानेवारी २०२५ मध्ये सुरू होणार असून त्यामुळे ग्रुप व्हिसा अर्ज सुलभ होईल आणि प्रक्रिया कालावधी जलद होईल. सध्या एकूण पर्यटकांमध्ये भारतीयांची संख्या फक्त ३.९ टक्‍के आहे. त्यांचे ध्येय पुढील वर्षापर्यंत ही संख्या १० टक्‍के पर्यंत वाढवण्याचे आहे. (South Africa Tourism)

(हेही वाचा – Virat Kohli : पत्नी अनुष्का शर्माने सांगितलं विराट कोहलीच्या तंदुरुस्तीचं रहस्य)

दक्षिण आफ्रिकन मंत्र्यांना आशा आहे की, व्हिसा सुरू केल्यामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होईल आणि दोन्ही देशांमधील पर्यटनाचे नाते आणखी मजबूत होईल. दक्षिण आफ्रिका २०२५ मध्ये जी२० अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार आहे. शाश्वत विकास, समन्वयित भरभराट आणि लोकांमधील नाते अधिक उत्तम करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. आपल्या भेटीबद्दल बोलताना मंत्री पॅट्रिशिया डे लिले म्हणाल्या की, “भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील नाते इतिहासात खोलवर रूजलेले आहे. ही भेट महत्त्वाच्या क्षेत्रांमधील आमचा समन्वय सखोल करेल. ही भेट भारताच्या प्रवास व्यापार भागीदारांसोबत समन्वय करण्याची संधी असेल. त्यातून अर्थपूर्ण सांस्कृतिक आणि र्थिक देवाणघेवाणीला चालना देत असतानाच सुलभ व समृद्ध करणारा पर्यटनाचा प्रवास होऊ शकेल. (South Africa Tourism)

भारतीय पर्यटक आमच्या पर्यटन क्षेत्राला एक वेगळा आयाम देतात. आम्ही दीर्घकालीन आठवणी निर्माण करत असतानाच दक्षिण आफ्रिकेचा आत्मा पाहण्यासाठी त्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत. “मोअर अँड मोअर” ब्रँड कॅम्पेन, मल्टी सिटी रोड शोज, कॉर्पोरेट थिंक टँक आणि लर्न एसए यांच्यासारख्या उपक्रमांमधून दक्षिण आफ्रिकन टुरिझमची भारतीय पर्यटकांना रेनबो नेशन दाखवण्याची वचनबद्धता दिसून येते. या प्रयत्नांचा हेतू थेट फ्लाइट मार्गांसाठी संधी निर्माण करताना, भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान मजबूत पर्यटन तसेच व्यापार संबंधांना चालना देताना सहजसाध्यता सुधारणे हा आहे.” भारत आणि दक्षिण आफ्रिकेला जोडण्यात पर्यटनाला असलेली महत्त्वाची भूमिका स्पष्ट करताना दक्षिण आफ्रिकन टुरिझम सीईओ नोम्बुलेलो गुलिवे म्हणाले की, “भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान खोलवर कनेक्शन निर्माण करण्यात पर्यटन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. आमच्या देशाचे अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य, बहुरंगी संस्कृती आणि हॉस्पिटॅलिटी यांचे प्रदर्शन घडवत असताना भारतीय पर्यटकांना दक्षिण आफ्रिकेत अद्भुत अनुभव घेण्यासाठी आम्ही प्रेरित करू शकू, अशी आशा आहे. (South Africa Tourism)

(हेही वाचा – Dhoni – Harbhajan Dispute : हरभजन सारखंच आणखी कोणाबरोबर होतं महेंद्र सिंह धोनीचं भांडण?)

आम्ही दक्षिण आफ्रिकेला भारतीय पर्यटकांसाठी पहिल्या क्रमांकाचे स्थान बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही त्यांना अविस्मरणीय ऐषारामी अनुभव तर देऊ इच्छितोच पण त्याचबरोबर साहस, वन्यजीव अनुभव आणि लक्झरी टुरिझमच्या संधीही देऊ इच्छितो. व्हिसा सुविधेतील नावीन्यपूर्णता आणि भारतीय टूर ऑपरेटर्ससोबतच्या भागीदारीमधील नावीन्यपूर्णतेद्वारे आम्ही दक्षिण आफ्रिकेला या वाढत्या बाजारपेठेत सहज पोहोचण्यायोग्य आणि आकर्षक बनवू इच्छितो. २०२३ हे वर्ष आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत भारतीय पर्यटकांची संख्या ४३ टक्‍क्‍यांनी वाढली. याच यशावर आधारित राहून २०२४ च्या सुरूवातीच्या रोड शोमध्ये १२००० पेक्षा जास्त मीटिंग्स झाल्या आणि दक्षिण आफ्रिकन टूरिझमसाठी १६०,००० तात्काळ लीड्स मिळाल्या. या प्रगतीसह आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंत आम्ही १००,००० भारतीय पर्यटक मिळवण्यासाठी काम करत आहोत. दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर भारतीय पर्यटक येऊ लागले आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ मध्ये ५७९९२ पर्यटक आले.” (South Africa Tourism)

भारत दक्षिण आफ्रिकेसाठी ७वी मोठी परदेशी बाजारपेठ ठरली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील पर्यटनाच्या संधी प्रतिबिंबित झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत येणाऱ्या ४१-५० वयोगटातील भारतीय प्रवाशांमध्ये २५ टक्के वार्षिक वाढ झाली आहे आणि कौटुंबिक प्रवासात १० टक्के वाढ झाली आहे. २०२४ मध्ये रेनबो नेशनला भेट देणाऱ्या भारतीय प्रवाशांमध्ये मुंबईचा वाटा सर्वाधिक म्हणजे ६४.३ टक्‍के तर पाठोपाठ दिल्ली आहे. लेझर ट्रॅव्हल हे एकूण भारतीय प्रवाशांमध्ये ३८.८ टक्‍के असून १८.३ टक्‍के लोक मित्र आणि कुटुंबांना (व्हीएफआर) भेटण्यास येतात. याशिवाय, मीटिंग्स, इन्सेन्टिव्हस, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स (माइस) विभाग हा देखील महत्त्वाचा भाग असून यात १९.१ टक्‍के भारतीय पर्यटक आहेत. त्यातील ४९.७ टक्‍के माइस आणि बिझनेस प्रवास श्रेणीतील आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत दक्षिण आफ्रिकन टुरिझमने भारतातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये १५ टक्‍के वाढ झाल्याचे नोंदवले आहे. (South Africa Tourism)

(हेही वाचा – काँग्रेस खासदार Abhishek Manu Singhvi यांच्या सीटवर नोटांचे बंडल; राज्यसभेत गदारोळ)

आपल्या भारतातील आठवडाभराच्या भेटीदरम्यान मिनिस्टर डे लिले शिष्टमंडळांच्या भेटी घेतील आणि पाच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आपसातील समन्वय मजबूत करतीलः पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि खाणकामः फार्मा आणि औषधे, आयसीटी/ डिजिटल आणि शिक्षण; पर्यटन, कला आणि क्रीडा; आणि कृषी आणि कृषी प्रक्रिया. हे प्रयत्न त्यांना हवामान बदल, अन्नसुरक्षा आणि शाश्वत विकास यांसारख्या जागतिक समस्यांवर उपाय काढत असतानाच आपसातील आर्थिक वाढीला चालना देणाऱ्या भागीदारीत वाढ करण्यात मदत करतील. मिनिस्टर एक प्रमुख पाहुण्या म्हणून ३५० राजनैतिक अधिकारी, व्यावसायिक नेते आणि सामाजिक प्रतिनिधींनाही भेटतील. त्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी व्हिसा आणि डिजिटल नावीन्यपूर्णता, आयबीएसए (भारत, जोहान्सबर्ग, साओ पावलो) कोड शेअर फ्लाइटमार्फत हवाई संपर्क सुधारणे, ग्रामीण पर्यटनाद्वारे आर्थिक संधींचा लाभ घेणे अशा विषयांवर भर देतील. याशिवाय दक्षिण आफ्रिकन शिष्टमंडळ दोन्ही देशांमधील १०० व्यावसायिक नेत्यांसोबत चर्चा करतील आणि व्यापार व गुंतवणुकीच्या संधींचा अभ्यास करतील. नावीन्यपूर्णता व आपसातील विकासाला चालना देण्यासाठी काम करतील. सातत्यपूर्ण पद्धतीने बदलत्या परिस्थितीत दोन्ही देशांमधील आव्हाने आणि संधींचा विचार केल्यामुळे व्यापक सहयोगासाठी पाया रचला जाईल. (South Africa Tourism)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.