महाराष्ट्र राज्यातल्या म्हणजेच छत्रपती संभाजी नगर (पूर्वीचे औरंगाबाद) शहराजवळ असलेल्या लेण्या या पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे जाणाऱ्या टेकडीवर वसलेली बारा दगडी बौद्ध मंदिरं आहेत. छत्रपती संभाजी नगर इथल्या लेण्यांचा पहिला संदर्भ कान्हेरी इथल्या लेण्यांच्या चैत्यामध्ये आहे. छत्रपती संभाजी नगर इथे असलेल्या लेण्या या ६व्या आणि ७व्या शतकामध्ये कोरण्यात आल्या होत्या. या लेण्या इतर खडकांच्या तुलनेने मऊ असलेल्या बेसाल्ट नावाच्या खडकापासून तयार करण्यात आल्या आहेत. (aurangabad caves)
छत्रपती संभाजी नगर येथे असलेल्या लेण्या या त्यांच्या स्थानानुसार तीन स्वतंत्र भागांमध्ये विभाजित बकेल्या गेल्या आहेत. त्यांपैकी पहिला म्हणजे पश्चिम भाग होय. या भागात १ ते ५ लेण्यांचा समावेश आहे. दुसरा भाग म्हणजे पूर्व भाग होय. या भागामध्ये ६ ते ९ लेण्यांचा समावेश आहे आणि तिसऱ्या भागाचं नाव नॉर्दर्न क्लस्टर असं आहे. या भागात १० ते १२ क्रमांकाच्या अपूर्ण गुहांचा समावेश होतो. (aurangabad caves)
(हेही वाचा – Bitcoin Hits All Time High : बिटकॉईनचा जागतिक स्तरावर १,००,००० अमेरिकन डॉलरचा नवा उच्चांक)
छत्रपती संभाजी नगर इथे असलेल्या लेण्यांमध्ये कोरीव काम, हीनयान शैलीतील स्तूप, महायान कलाकृती आणि वज्रयान देवी यांचा समावेश आहे. या लेण्या हा एक भारतातल्या पहिल्या सहस्राब्दी मधल्या कलाकृतीचा नमुनाच आहे. या लेण्यांमध्ये दुर्गा माता, गणेशमूर्ती आणि कित्येक इतर देवता कोरलेल्या आढळतात. ६व्या आणि ८व्या शतकामध्ये कोरण्यात आलेली छत्रपती संभाजी नगरची ही गुहा मंदिरं छत्रपती संभाजी नगर शहराच्या मधोमध ९ किलोमीटर एवढी आहे. (aurangabad caves)
सिहायचल पर्वतरांगांमध्ये कोरण्यात आलेल्या या छत्रपती संभाजी नगरच्या लेण्यांना, युनेस्कोतर्फे जाहीर करण्यात आलेल्या एलोरा आणि अजिंठा गुंफा मंदिरांसारख्या जागतिक वारसा स्मारकांनी काही प्रमाणात झाकून टाकलं आहे. छत्रपती संभाजी नगर इथल्या लेण्यांच्या शिल्पांची तुलना अजिंठा आणि एलोराशी होऊ शकते. तरीही या लेण्या खूपच लहान, जीर्ण आणि पर्यटकांनी कमी प्रमाणात भेट दिलेल्या आहेत. २० व्या शतकामध्ये काही विद्वानांनी या गुंफा मंदिरांकडे अजिंठा आणि एलोरा यांच्यातील एक गहाळ दुवा म्हणून पाहण्यास सुरुवात केली होती. या लेण्या म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत एक संरक्षित स्मारक आहेत. (aurangabad caves)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community