botanical garden chandrapur : अटलबिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनचं वैशिष्ट्य जाणून घेऊया

105
botanical garden chandrapur : अटलबिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनचं वैशिष्ट्य जाणून घेऊया

महाराष्ट्रातलं चंद्रपूर इथे असलेलं अटलबिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनचं प्रवेश शुल्क ₹६० आहे. हे गार्डन सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असतं. (botanical garden chandrapur)

या उद्यानात अनेक आकर्षणे आहेत. जसे की..
  • नैसर्गिक इतिहास संग्रहालय
  • विज्ञान संग्रहालय
  • मत्स्यालय
  • जंगल सफारी राईड
  • गुलाबाच्या फुलांची बाग
  • खुले विज्ञान उद्यान
  • फुलपाखरू बाग

(हेही वाचा – “हिच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती”, Keshav Upadhyay यांचा उद्धव ठाकरे-शरद पवारांना टोला)

चंद्रपूर इथल्या उद्यानाची वैशिष्ट्ये
  • जैवविविधता आणि नैसर्गिक महत्त्व

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळच्या चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या, तसंच मध्य चांदा वनविभागच्या अंतर्गत येणाऱ्या या उद्यानात समृद्ध जैवविविधता आणि रोमांचक ठिकाणं आहेत. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त असलेलं हे उद्यान महाराष्ट्रातल्या विस्तारित जंगलांमधल्या परिसंस्था, वन्यजीव अधिवास आणि कॉरिडॉर यांना एकत्र जोडून ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. (botanical garden chandrapur)

  • मानव आणि वन्यजीव यांच्यातला संघर्ष

या प्रदेशात मानवी जीवन सुरळीत करण्याच्या आणि वन्यजीव संवर्धन करण्याच्या प्रयत्नांमधला संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. जंगलातून मिळणाऱ्या गोष्टींचं संकलन आणि प्राण्यांना चरवण्याद्वारे आपल्या उदरनिर्वाहासाठी जंगलावर अवलंबून असलेल्या स्थानिक समुदायांनी मानवी जीवन आणि वन्यजीव संरक्षण यांच्यातलं नाजूक संतुलन धोक्यात आणलं आहे. मात्र आता सरकार यावर सकारात्मक उपाययोजना करत आहे.

  • अभिनव संवर्धन उपक्रम

या आव्हानांना तोंड देण्यासाठी मध्य चांदा इथल्या वनविभागाने तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अटलबिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनची स्थापना करण्यात आली. संवर्धन शिक्षण आणि प्रयत्नांना चालना देण्याबरोबरच स्थानिक समुदायाला उपजीविकेचे पर्याय उपलब्ध करून देऊन मानव आणि वन्यजीव यांच्यातला संघर्ष कमी करणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे.

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांना निवृत्तीवेतनधारकांचे पत्र; ‘लाडका बाबा योजना’ सुरु करण्याची मागणी)

भूमिगत संग्रहालय

या भूमिगत संग्रहलयामध्ये सांस्कृतिक कला आणि नैसर्गिक इतिहासाचं अप्रतिम प्रदर्शन मांडलेलं आहे. इथल्या ३६०-डिग्रीच्या थिएटरमध्ये रोमांचक अनुभव येतो. या संग्रहालयामध्ये सांस्कृतिक परंपरा आणि वैज्ञानिक शोधांचा सन्मान ठेवूनच प्राचीन कलाकृती आणि अद्भुत नैसर्गिक प्रदर्शनांचे समृद्ध मिश्रण सादर केलं गेलं आहे. हा अनोखा शैक्षणिक प्रवास या संग्रहालयात पाहायला मिळतो. (botanical garden chandrapur)

मत्स्यालय

या मत्स्यालायच्या काचेच्या भिंतींमागे नदी आणि समुद्रातले मासे आणि विविध प्रकारचे जलचर प्राणी असणारं सागरी जीवन प्रदर्शित केलं गेलं आहे. या मत्स्यालयाने या उद्यानाच्या सौंदर्यात भर घातली आहे.

विज्ञान केंद्र

या विज्ञान केंद्रामध्ये विविध वनस्पती आहेत. या ठिकाणी कार्यशाळा, लाइव्ह डेमो आणि प्रगत प्रदर्शनांसोबतच, वनस्पती आणि पृथ्वी यांच्यातील खोल संबंध अनुभवायला मिळतो. हे विज्ञान केंद्र म्हणजे नवशिक्यांपासून ते तज्ञांपर्यंत सर्वांसाठीच योग्य असं प्रेरणास्थान आहे. त्यामुळे इथे शिक्षण आणि मौज एकत्र मिळते.

(हेही वाचा – US California Earthquake: अमेरिकेत ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचाही इशारा)

जैव विविधता

या उद्यानात जैवविविधतेचं प्रदर्शन पाहायला मिळतं. त्यामध्ये वनस्पती, जीवाणू, प्राणी आणि मानव यांप्रमाणेच पृथ्वीवर असलेल्या विविध प्रकारच्या जीवसृष्टींचा समावेश आहे. या सर्व प्रजातींची समृद्ध विविधता असलेल्या भागांमध्ये स्थिर वातावरण असते. स्वच्छ हवा, अन्न आणि पाणी यांसारख्या आवश्यक गोष्टींसाठी मानवी आयुष्य इकोसिस्टमवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे उच्च पातळीचा टिकाऊपणा राखण्यासाठी नैसर्गिक जैवविविधता जतन करणं अत्यंत गरजेचं आहे. (botanical garden chandrapur)

डायनो पार्क

ओपन डायनासोर पार्क हा एक अतिशय रोमांचक अनुभव आहे. या पार्कमध्ये नैसर्गिक वातावरणात असलेल्या डायनासोरच्या मोठ्या आकाराच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. हे पार्क म्हणजे सर्व वयोगटांसाठी एक शैक्षणिक आणि मनोरंजक अनुभव घेण्याचं एक उत्तम स्थान आहे. हे ठिकाण कौटुंबिक सहलीसाठी अगदी योग्य आहे.

बटरफ्लाय पार्क

बटरफ्लाय पार्कमध्ये फुलपाखरांच्या १०० पेक्षा जास्त प्रजातींचे प्रदर्शन पाहायला मिळतं. हे एक अतिशय शांत असं स्थान आहे. या पार्कमध्ये या रंगीबेरंगी कीटकांचे नैसर्गिक अधिवासात त्यांचं संपूर्ण जीवनचक्र आणि पर्यावरणीय महत्त्व पाहायला मिळतं. हे शांत वातावरणाचं उद्यान सर्व वयोगटातल्या निसर्गप्रेमींसाठी शांततापूर्ण अनुभव घेण्यासाठी उत्तम स्थान आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.