Mohammed Shami : मोहम्मद शमी खेळला ११ दिवसांत ६ सामने, तंदुरुस्तीची खरी परीक्षा

Mohammed Shami : सय्यद मुश्ताक अली स्पर्घेत शमीची प्रभावी कामगिरी.

90
Mohammed Shami : मोहम्मद शमी खेळला ११ दिवसांत ६ सामने, तंदुरुस्तीची खरी परीक्षा
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार तेज गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतीतून आता सावरेला दिसत आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत शमी ११ दिवसांत सलग ६ सामने खेळला आहे आणि यात त्याने निर्धाव चेंडूंचा सपाटाच लावलेला दिसत आहे. सहाव्या सामन्यात शमीने २४ पैकी १५ चेंडू निर्धाव टाकले. राजकोटमध्ये झालेल्या अ गटातील लढतीत बंगालने बिहारचा ९ गडी राखून पराभव केला. यात शमीची गोलंदाजी आणि करण लालच्या ९४ धावा निर्णायक ठरल्या.

(हेही वाचा – US California Earthquake: अमेरिकेत ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचाही इशारा)

बिहारने १४८ धावांचं आव्हान बंगालसमोर ठेवलं होतं. लालच्या ४७ चेंडूंत ९४ धावांच्या खेळीमुळे बंगालने हे आव्हान चौदाव्या षटकातच पार केलं. लालने ६ षटकार आणि ७ चौकार ठोकले. सगळ्यांचं लक्ष मात्र मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) होतं आणि त्याने ४ षटकांत फक्त १८ धावा देत १ बळीही मिळवला. या आधी मेघालयाविरुद्धच्या सामन्यातही त्याने १६ धावाच दिल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत आतापर्यंत आपली तंदुरुस्ती सिद्ध करताना शमी ११ दिवसांत ६ सामने खेळला आहे आणि यातील प्रत्येक सामन्यात त्याने गोलंदाजीचा ४ षटकांचा कोटा संपवला आहे. फक्त एकदाच सामना लवकर संपल्यामुळे त्याला ३ चेंडू कमी टाकावे लागले.

(हेही वाचा – बाबासाहेबांच्या संविधानामुळे कोणी मुख्यमंत्री तर कोणी उपमुख्यमंत्री : Eknath Shinde)

शमी आता पूर्ण क्षमतेनं गोलंदाजी करताना दिसत आहे. पण, नेमकं त्याला ऑस्ट्रेलियाला कधी पाठवणार किंवा पाठवणार का, यावर बीसीसीआयने कुठलाही माहिती दिलेली नाही. भारतीय संघाचे फीजिओ नितीन पटेल शमीच्या (Mohammed Shami) बरोबर आहेत आणि त्याच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी आपला अहवाल दिल्यानंतर बीसीसीआय शमीला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यावर निर्णय घेऊ शकेल. तर काहींच्या मते शमीने अजून काही सामने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची गरज आहे. दिवसभर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्याची क्षमता त्याने सिद्ध केली तरंच त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवता येईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.