Parliament Winter Session : प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवण्याची रविंद्र वायकरांची मागणी

123
Parliament Winter Session : प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवण्याची रविंद्र वायकरांची मागणी
  • प्रतिनिधी

मुंबईच्या विविध भागातील वाढत्या झोपडपट्ट्या ही एक मोठी समस्या बनली आहे. तिला आळा घालण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना मुंबईत प्रभावीपणे राबवून स्वस्त व चांगली चांगली घरे बांधण्यात आल्यास झोपडपट्ट्याचे वाढते प्रमाण निश्चित कमी होईल, असे मत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभा नियम ३७७ अन्वये मांडलेल्या प्रस्तावादरम्यान व्यक्त केले. (Parliament Winter Session)

(हेही वाचा – Mumbai Crime : साडेतीन कोटींच्या शेअर्स ट्रेडिंग फसवणूक प्रकरणी तिघांना दिव्यातून अटक)

मुंबईतील वाढत्या झोपडपट्ट्या, येथील राहिवाश्यांना मूलभूत सेवा व सुविधा देताना येणाऱ्या अडचणी, मुंबईतील गरीब व सर्वसामान्य लोकांच्या हाताबाहेर गेलेल्या घरांच्या किंमती आदि विषयावर लोकसभेत नियम ३७७ अन्वये प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत १० लाख कोटींची बजेट मध्ये तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुंबईत स्वस्त व गुणवत्ता पूर्वक घरे बांधण्याची योजना तयार केल्यास, झोपड्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे शक्य होईल. त्याच बरोबर मुंबईतील मध्यम वर्ग जनतेसाठी परवडणारी घरे तसेच गरीब परिवारांसाठी भाड्याची घरे निर्माण करणे आवश्यक आहे. यामुळे ज्यांना घर घेण्याची इच्छा आहे ते घर घेऊ शकतील. (Parliament Winter Session)

(हेही वाचा – Rupee Declining : भारतीय रुपयांत सातत्याने का होतेय घसरण?)

परवडणारी व भाड्याच्या घरांच्या योजनेमुळे चांगली व सुरक्षित घरांचा विकल्प गरीब व माध्यम वर्गीय जनतेला मिळाल्यामुळे झोपड्यांच्या संखेत घट होईल. यामुळे या दोन्ही जनतेचे जीवनमान उंचवण्यासही मदत मिळणार आहे. त्याच बरोबर मुंबईचा विकास संतुलित ठेवणे शक्य होणार आहे, असेही खासदार रविंद्र वायकर यांनी नियम ३७७ अन्वये मांडलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे. हा प्रस्ताव मंजूर करून लोकसभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. (Parliament Winter Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.