- प्रतिनिधी
पूर्व द्रुतगती महामार्गावर बेकायदेशीररित्या आयोजित करण्यात आलेल्या घोडागाडी शर्यती प्रकरणी अखेर आयोजक, घोडागाडी चालक, मालक आणि इतरांविरुद्ध पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या शर्यतीबाबत पोलिसांना कुठलीही कल्पना नव्हती, या शर्यतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai Crime)
(हेही वाचा – Dormant Bank Accounts : देशातील निद्रिस्त बँक खात्यांमध्ये १ लाख कोटी रुपये पडून)
पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही शर्यत मंगळवारी ३ नोव्हेंबरला पहाटे ३ ते पहाटे ४ या वेळेत आयोजित करण्यात आली होती. घाटकोपर पश्चिम येथील फातिमा ख्रिश्चन कम्युनिटी हॉलमध्ये बेकायदेशीर घोडागाडी शर्यतीची योजना आरोपींनी आखली. त्यानंतर घाटकोपर पूर्वेकडील इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील अदानी बिल्डिंग समोरील पोलिस पेट्रोल पंपाजवळून शर्यतीला सुरुवात झाली. (Mumbai Crime)
(हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमी खेळला ११ दिवसांत ६ सामने, तंदुरुस्तीची खरी परीक्षा)
पूर्व द्रुतगती महामार्गवरील विक्रोळीच्या दिशेने ही शर्यत पार पडली. घोडागाड्यांव्यतिरिक्त, अनेक तरुण मोटारसायकल आणि कारमधून कार्यक्रमात सामील झाले. या शर्यतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले होते. ज्यामध्ये एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना टॅग केले होते आणि “मुंबई पोलीस घोडेस्वारी चालू असताना झोपले होते” असे लिहले होते. अखेरीस, पंतनगर पोलिसांनी अज्ञात आयोजक, घोडागाडी चालक/मालक आणि इतरांविरुद्ध अनधिकृतपणे सार्वजनिक महामार्गावर घोडागाडी शर्यत आयोजित करणे, जीव धोक्यात घालणे आणि मोकाट जनावरांप्रती निष्काळजीपणाने व क्रूरपणे वागणे यासाठी तक्रार दाखल केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. (Mumbai Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community