Vinod Kambli : विनोद कांबळीची तब्येत नेमकी कशाने बिघडते? शाळकरी मित्रानेच सांगितलं

246
Vinod Kambli : विनोद कांबळीची तब्येत नेमकी कशाने बिघडते? शाळकरी मित्रानेच सांगितलं
Vinod Kambli : विनोद कांबळीची तब्येत नेमकी कशाने बिघडते? शाळकरी मित्रानेच सांगितलं
  • ऋजुता लुकतुके

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी शिवाजी पार्कवर एका कार्यक्रमात जाहीर एकत्र आल्यानंतर दोघांमधील मैत्री आणि विनोद कांबळीचं बदललेलं रुप यांची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे. सचिन आणि विनोद यांनी शालेय दिवसांपासून एकत्र खेळायला सुरुवात केली. हॅरिस शिल्डमध्ये ६६४ धावांच्या भागिदारीचा विक्रम दोघांनी एकत्र रचला. पण, आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या बाबतीत सचिन जसा वर वर पायरा चढत गेला तसं विनोदला जमलं नाही. एका सहकारी बँकेचं कर्ज थकवल्याची तक्रारही त्याच्या बाबतीत झाली.  (Vinod Kambli)

(हेही वाचा- ICC Test Championship : आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची चुरस वाढली, २-३ दिवसांत स्पष्ट होणार चित्र )

रमाकांत आचरेकरांचे हे दोन शिष्य आज निवृत्तीनंतर दोन टोकांना आहेत. विनोदचा असा ऱ्हास होण्याचं कारण त्याचाच एक जीवलग मित्र मार्कस कुटोने टाईम्स वृत्त समुहाशी बोलताना दिलं आहे. ‘विनोदला तब्येतीच्या अनेक तक्रारी आहेत. आणि तो किमान १४ वेळा नशामुक्ती केंद्रात जाऊन आला आहे,’ असं कुटो टाईम्स समुहाशी बोलताना म्हणाला. (Vinod Kambli)

विनोदचा तोलही सांभाळता न येणारा व्हीडिओ प्रसिद्ध झाला तेव्हाही कुटो विनोदच्या वांद्रे येथील घरात गेला होता. तेव्हाने त्याने विनोदची चौकशी केली. आणि वसई येथील केंद्रात भरती होण्याचा सल्ला दिला होता. ‘फक्त मीच नाही, तर कपिल देव यांनीही विनोदला मदत करण्याची तयारी तेव्हा दाखवली होती. त्यांनी त्यांचे संघ सहकारी बलविंदर सिंग संधूला तसं सांगितलं होतं. पण, पहिलं पाऊल विनोदने उचलायला हवं, असं कपिल यांचं म्हणणं होतं’ असं कुटो यांनी सांगितलं. (Vinod Kambli)

(हेही वाचा- बुलडोझर मॅन अशी ओळख असणारे Shrikar Pardeshi मुख्यमंत्र्यांचे नवे सचिव)

जर विनोद कांबळीने नशामुक्ती केंद्रात स्वत: प्रवेश घेतला तर पुढील मदत ते करतील, असं कपिल देव यांनी सांगितलं होतं. पण, विनोद यापूर्वी १४ वेळा तिथे जाऊन आल्याचं कुटो यांनी सांगितलं. मार्कस कुटो सध्या रणजी स्तरावर पंच म्हणून काम पाहतात. बेशिस्त वर्तणुकीमुळेच विनोद कांबळीवर ही वेळ आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  (Vinod Kambli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.