-
ऋजुता लुकतुके
आयसीसीसमोर सध्या एक ज्वलंत प्रश्न आहे तो आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचं काय करायचं? ही स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानमध्ये प्रस्तावित आहे. पण, भारतीय संघाने पाकिस्तानला जायला नकार दिल्यापासून स्पर्धेभोवती अनिश्चिततेचं वातावरण आहे. भारताने सुचवलेलं हायब्रीड मॉडेल गेल्या आठवड्यात पाकिस्तानने स्वीकारलं. पण, त्यासाठी दोन अटी घातल्या. पहिली अट होती आयसीसीकडून नफ्याचा अतिरिक्त हिस्सा मागण्याची. दुसरी अट होती, ती भारतातील स्पर्धांसाठीही हायब्रीड मॉडेल ठेवण्याची. म्हणजे भारतात पुढील काळात होणाऱ्या टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषक तसंच चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानला हायब्रीड मॉडेल हवं आहे. ते ही भारताचा दौरा करणार नाहीत, अशी त्यांची भूमिका आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- ICC Test Championship : आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची चुरस वाढली, २-३ दिवसांत स्पष्ट होणार चित्र )
दुसरी अट भारताने फेटाळली. वर ‘पाकिस्तानमध्ये आहे तसी सुरक्षेची समस्या आमच्या देशात नाही,’ असंही बीसीसीआयने आयसीसीला सांगितलं. त्यामुळे आता आयसीसीकडे एकच पर्याय आहे. येणाऱ्या दिवसांत पुन्हा एकदा दोन्ही देशांची मनधरणी करण्याचा. आयसीसी पुढील आठवड्यात सदस्य देशांच्या बैठका बोलावून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल असं दिसतंय. आयसीसीचे अध्यक्ष म्हणून जय शाह यांच्यावर ती जबाबदारी असेल. (Champions Trophy 2025)
भारत आणि पाकिस्तान राजी होतील असा हा तोडगा हवा हे स्पष्टच आहे. पण, त्याचबरोबर आणखी एक गोष्ट हा निर्णय घेताना महत्त्वाची ठरणार आहे. यजमान देशच ठरलेला नसल्यामुळे अजून स्पर्धेच्या प्रसारणाचे मीडिया हक्क अजून विकले गेलेले नाहीत. एकदा तो प्रश्न आला की, पाकिस्तानची बाजू किती लुळी पडते ते पाहा. (Champions Trophy 2025)
चॅम्पियन्स करंडकाचे मीडिया हक्क – ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर
एकूण सामने – १५
भारतीय संघाने माघार घेतल्यास आयसीसीचं होणारं नुकसान – ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलरपैकी ९० टक्के
पाकिस्तानने माघार घेतल्यास आयसीसीचं होणारं नुकसान – ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलरपैकी १० टक्के
(हेही वाचा- बुलडोझर मॅन अशी ओळख असणारे Shrikar Pardeshi मुख्यमंत्र्यांचे नवे सचिव)
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा रद्द तर होणार नाही. पण, जर आयसीसीला एकतर्फी निर्णय घ्यावा लागला तर हा आकडा निर्णयावर प्रभाव टाकणारा नक्कीच असू शकतो. शिवाय सदस्य देशांचं मतही विचारात घेतलं जाऊ शकतं. आणि त्यांचं मतदानही होऊ शकतं. अशावेळीही हा आकडा इतर क्रिकेट मंडळांसाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण, स्पर्धेच्या यशातील वाटा हा प्रत्येकच क्रिकेट मंडळाला मिळतो. त्यामुळे पाकिस्तान संघ इरेला पेटला तर आयसीसी क्रिकेटच्या हिताचा विचार करून एकतर्फी निर्णय घेऊ शकतं. आणि तो निर्णय पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेण्याचाही असू शकतो. (Champions Trophy 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community