नववर्षाच्या स्वागतासाठी दि. ३१ डिसेंबर रोजी हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये मेजवान्या आयोजित करण्यात येतात. यावेळी निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थाचा पुरवठा होऊन अन्न विषबाधा होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (FDA) हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबवर करडी नजर असेल. दि. ५ ते ३१ डिसेंबर रोजी रेस्टॉरंट, क्लबमध्ये विशेष तपासणी मोहिम घेतली जाईल.(FDA)
( हेही वाचा : ICC Test Championship : आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची चुरस वाढली, २-३ दिवसांत स्पष्ट होणार चित्र )
हॉटेल, क्लब, रेस्टॉरंटमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवठा होण्यापासून रोखण्यासाठी आळा घालण्यासाठी दि. ५ ते दि. ३१ डिसेंबर रोजी तपासणी मोहिम राबवली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) सह आयुक्त (अन्न) मंगेश माने (Mangesh Mane) यांनी दिली. तसेच अन्न पदार्थांच्या गुणवत्ता आणि दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याची सविस्तर तक्रार प्रशासनाच्या मोफत क्रमांक १८००२२२३६५ वर करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. (FDA)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community