-
ऋजुता लुकतुके
सेबीने भारतातील म्युच्युअल फंड कंपन्यांना थीमवर आधारित म्युच्युअल फंड सुरू करण्याची परवानगी दिली, त्यानंतर प्रसिद्ध झालेला एक म्युच्युअल फंड म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग फंड. यात म्युच्युअल फंड कंपनी फक्त उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्येच गुंतवणूक करते. आपल्याकडे उपलब्ध पैशांपैकी ८० टक्के भांडवल हे फंड उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांचे रोखे किंवा या कंपन्यांच्या बाँड, डिबेंचरमध्येच गुंतवत असतात. (ICICI Manufacturing Fund)
(हेही वाचा- Kisan Pehchan Patra : केंद्र सरकारच्या नवीन शेतकरी ओळखपत्राविषयी सर्व माहिती वाचा एका क्लिकवर)
उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी शेअर बाजारात जशी सुधारले तसे तुमच्या फंडाची किंमतही वाढेल, हे उघड आहे. इतर कुठल्याही म्युच्युअल फंडाप्रमाणे इथंही चांगले पैसे उभे राहण्याच्या दृष्टीने किमान ३ वर्षांची गुंतवणूक आवश्यक असल्याचं जाणकार सांगतात. ११ ऑक्टोबर २०१८ मध्ये आयसीआयसीआय मॅन्युफॅक्चरिंग म्युच्युअल फंड सुरू झाला. त्यामुळे या क्षेत्रातील तो एक जुना म्युच्युअल फंड आहे. आणि यातील गुंतवणुकीची जोखीम खूप जास्त असल्याचं (व्हेरी रिस्की) सेबीनेच आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. अगदी १०० रुपयांपासून इथं तुम्हाला एसआयपी सुरू करता येते. तर एकरकमी गुंतवणुकीसाठी किमान मर्यादा ५,००० रुपये आहे. (ICICI Manufacturing Fund)
आता आयसीआयसीआय मॅन्युफॅक्चरिंग फंडाविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया,
फंड नाव – आयसीआयसीआय मॅन्युफॅक्चरिंग फंड
ताजी एनएव्ही – ३३.९३ (२ डिसेंबर २०२४)
एंट्री लोड – शून्य
फंडात एकूण गुंतवणूक – ६७१६ कोटी रु.
एक्झिट लोड – गुंतवणुकीनंतर एका महिन्याच्या आत पैसे काढून घेतल्यास १ टक्के एक्जिट लोड. बाकी एक्जिट लोड लागू नाही
(हेही वाचा- ढाक्यातील Pakistan Embassy ठरले धर्मांधांचे केंद्र; हिंदूंविरोधात कट रचून घडवले ३ हजारांहून अधिक हल्ले)
फंड मॅनेजर – अनिष तवाकले व ३४ फंड मॅनेजरचा चमू
गुंतवणूक – कंपनीची ९० टक्क्यांच्यावर गुंतवणूक ही भारतीय उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आहे. त्यातही कंपन्यांच्या डेरिव्हेटिव्हमधील गुंतवणूक १ टक्क्याहूनही कमी आहे. तर ९७ टक्के गुंतवणूक इक्विटी आणि ४ टक्के कंपनीच्या डेब्ट फंडात या म्युच्युअल फंडाची गुंतवणूक आहे. त्यातही सध्या या फंडाने भारतीय ऑटो कंपन्यांमध्ये १५ टक्के, उत्पादन कंपन्यांमध्ये १२ टक्के, सिमेंट कंपन्यांमध्ये १० टक्के, फार्मा कंपन्यांमध्ये ७ टक्के गुंतवणूक केली आहे. (ICICI Manufacturing Fund)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community