- ऋजुता लुकतुके
भारतीय रेल्वेत स्टेशन मास्तर हे महत्त्वाचं आणि जबाबदारीचं पद आहे. एका रेल्वे स्थानकाची संपूर्ण जबाबदारी ही स्टेशन मास्तरची असते आणि भारतीय रेल्वेतील नोकऱ्यांमध्ये हे पद सगळ्यात लोकप्रिय आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अर्थात, रेल्वे मंडळ ही नियुक्ती करत असतं. (Station Master Salary)
स्टेशन मास्तर होण्यासाठी लागणारी पात्रता, शिक्षण आणि त्यांना मिळणारा मासिक पगार समजून घेऊया,
किमान पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना रेल्वेची स्टेशन मास्तरसाठी घेतली जाणारी परीक्षा देता येते आणि या परिक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणानंतर रेल्वे स्थानकांवर नियुक्त केलं जातं. या पदावर मुख्य आणि उप अशी दोन पदं असतात आणि अनुभवानंतर तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता वाढते. (Station Master Salary)
(हेही वाचा – अपमान सहन न झाल्याने Aaditya Thackeray सभागृहातून बाहेर गेले?)
स्टेशन मास्तरांना मिळणारा पगार हा रेल्वे स्थानकाचा आकार, शहरी वा निमशहरी भाग यावर अवलंबून असतो. शिवाय या पदाच्या एक्स, वाय आणि झेड अशा श्रेणीही आहेत. नवीन नियुक्ती झालेल्या स्टेशन मास्तरला भारतात सरासरी ३५,४०० रुपये इतका मासिक पगार मिळतो. तुमची पहिली नियुक्ती ही उप स्टेशन मास्तर या पदावरच होत असते. सरकारी नोकरीच्या श्रेणींमध्ये हे सहाव्या श्रेणीचं पद आहे आणि अनुभव व कामगिरीच्या जोरावर स्टेशन मास्तर ७ आणि ८ व्या श्रेणीपर्यंत वर जाऊ शकतो. (Station Master Salary)
स्टेशन मास्तरला मिळणाऱ्या मासिक सरासरी वेतनाची फोड बघूया,
(हेही वाचा – India Advisory on Syria : ‘ताबडतोब देश सोडा’; सीरियामधील भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन; कारण काय?)
शिवाय स्टेशन मास्तर म्हणून भारतीय रेल्वेकडून त्यांना विविध भत्ते आणि सवलती मिळत असतात. कामाच्या निमित्ताने दौरा करावा लागला तर स्टेशन मास्तरला दैनिक भत्ता मिळतो. अतिरिक्त काम केल्याचे पैसेही त्यांना लागू होतात. तर सुटीच्या दिवसांत काम केलं तर सुटीचा भत्ताही त्यांना मिळतो. रात्रपाळी केल्याबद्दल त्यांना मासिक २,७०० रुपये अतिरिक्त देण्यात येतात. स्टेशन मास्तर आणि त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वेतील थ्री-टियर डब्यात मोफत प्रवास करता येतो. दुर्गम किंवा आदिवासी भागात नियुक्ती झाली असेल तर अशा स्टेशन मास्तरांना रेल्वेच्या तरतुदींनुसार अधिकचा भत्ता मिळू शकतो. (Station Master Salary)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community