Malegaon Vote Jihad प्रकरणी सात ठिकाणी ईडीची छापेमारी; किरीट सोमय्यांनी दिली माहिती

107
Malegaon Vote Jihad प्रकरणी सात ठिकाणी ईडीची छापेमारी; किरीट सोमय्यांनी दिली माहिती
Malegaon Vote Jihad प्रकरणी सात ठिकाणी ईडीची छापेमारी; किरीट सोमय्यांनी दिली माहिती

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही वोट जिहादचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे भाजपाने एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ऐकू आल्या. त्यानंतर विधानसभेचा निकाल लागून आता महायुतीची सत्ताही स्थापन झालेली आहे. त्यादरम्यान मालेगाव वोट जिहादप्रकरणी ईडीकडून सात ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. मालेगावमधील बँकेत कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाला असून हे पैसे वोट जिहादसाठी (Vote Jihad) वापरल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला होता. (Malegaon Vote Jihad)

( हेही वाचा : Shree Ram विवाह यात्रेवर इस्लामिक कट्टरपंथींची दगडफेक

याप्रकरणी किरीट सोमय्या म्हणाले की, “मालेगाव वोट जिहाद (Malegaon Vote Jihad) या घोटाळ्यात दि. ६ डिसेंबर रोजी ईडीने पुन्हा एकदा मुंबई, अहमदाबाद येथील सात ठिकाणी छापे मारले. यामध्ये ईडीने (ED) साडे तेरा कोटी रुपये जप्त केले आहेत. आतापर्यंत या प्रकरणातील मुख्य आरोपी सिराज मोहम्मदच्या खात्यात एक हजार कोटी रुपये जमा झाले. यात ५ आरोपींना अटक केली असून ७ आरोपी फरार आहेत,” असे त्यांनी सांगितले. तसेच या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी पुन्हा एकदा दि. ९ डिसेंबर रोजी मालेगावला जाणार असल्याचेही सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितले. (Malegaon Vote Jihad)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.