Rahul Gandhi विरोधात ममता बॅनर्जी यांनी थोपटले दंड

114
Rahul Gandhi विरोधात ममता बॅनर्जी यांनी थोपटले दंड
  • प्रतिनिधी

सध्या इंडी आघाडी समोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. त्यातच इंडी आघाडीचे नेतृत्व करणाऱ्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. राहुल गांधी इंडी आघाडीचे नेतृत्व करण्यात सक्षम नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इंडी आघाडीची संकल्पना आपली होती. त्यामुळे नेतृत्व आपल्याकडे सोपविण्यात यावे, अशी अपेक्षा देखील त्यांना व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हरियाणा-महाराष्ट्र आणि पोटनिवडणुकीत इंडी ब्लॉकच्या खराब कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – Maharashtra Legislature Special Session 2024 : राज्य विधिमंडळाचे ३ दिवसीय विशेष अधिवेशन सुरू; अध्यक्षांची निवड होणार)

एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, मी इंडी आघाडी बनवली होती. आता ते व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी नेत्यांची आहे. जर ते नीट चालवू शकत नसतील तर आपण काय करू शकतो? मी एवढेच म्हणेन की, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे. ममता म्हणाल्या, जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच या आघाडीचे नेतृत्व करेन. मला बंगालच्या बाहेर जायचे नाही, पण मी येथून आघाडी चालवणार आहे. मी येथे मुख्यमंत्री असताना दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडू शकते. ममता यांना पक्षातील त्यांच्या उत्तराधिकारी बाबत विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या, टीएमसी हा शिस्तप्रिय पक्ष आहे. इथे कोणताही नेता स्वतःच्या अटी घालू शकत नाही. जनतेचे भले काय ते पक्ष ठरवेल. आमच्याकडे आमदार, खासदार, बूथ कार्यकर्ते आहेत, माझ्यानंतर पक्षाची धुरा कोण घेणार हे ठरवतील. (Rahul Gandhi)

(हेही वाचा – Comedian Sunil Pal Missing : कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता प्रकरणी चार दिवसांनी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल)

ममता बॅनर्जी यांच्या जवळचे नेते आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या जवळचे नेते यांच्यात मतभेदाची परिस्थिती गेल्या अनेक दिवसांपासून टीएमसीमध्ये पाहायला मिळत आहे. याबाबत ममता म्हणाल्या, पक्षासाठी प्रत्येकजण महत्त्वाचा आहे. आजचा नवा चेहरा उद्याचा दिग्गज असेल. प्रशांत किशोर यांच्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, रणनीतीकारांनी निवडणुका जिंकल्या जात नाहीत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची मदत घेण्याच्या प्रश्नावर ममता म्हणाल्या, काही रणनीतीकार घरी बसून सर्वेक्षण करतात आणि नंतर सर्वेक्षण बदलतात. ते योजना आणि नियोजन करू शकतात, परंतु मतदारांना बूथपर्यंत आणू शकत नाहीत. फक्त बूथ कार्यकर्त्यांना गाव आणि जनता माहित असते, हेच लोक निवडणुका जिंकतात. निवडणूक रणनीतीकार हे केवळ कलाकार असतात, जे पैशाच्या बदल्यात आपले काम करतात, पण त्यांच्याद्वारे निवडणुका जिंकल्या जात नाहीत. (Rahul Gandhi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.