महाराष्ट्र विधानसभेचे आज विशेष अधिवेशन सुरू झाले. यामध्ये एक गंमतशीर किस्सा घडला आणि सभागृहांमध्ये एकच हास्य सुरू झाले. भाजपचे कसब्याचे आमदार चुकून विरोधी पक्षाच्या गटामध्ये जाऊन बसले होते. मात्र सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शपथविधी झाल्यानंतर विरोधी पक्षाचा बाकाजवळून जाताना दादांनी हाताला धरून रासने यांना सत्ताधारी पक्षाच्या गोटात घेऊन आले. (MLA Oath Taking Ceremony)
कोण आहेत हेमंत रासने ?
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचंड मतांनी पराभव करत कसब्याचा पारंपारिक मतदार संघ भाजपकडे पुन्हा ओढून आणला आहे.२०२३ साली झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये हेमंत रासने यांचा पराभव झाला होता. त्याचीच भरपाई करत रासने यांनी यावेळेस विजयश्री ओढून आणला. हेमंत रासने हे पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची ओळख झाली असून, त्यांना भाजपमध्ये एक महत्त्वाची भूमिका दिली गेली आहे. (MLA Oath Taking Ceremony)
नक्की घडलं काय ?
आज विधानसभेचे विशेष अधिवेशन होते.आज शपथविधी दरम्यान हेमंत रासने यांनी विधानसभा सभागृहात प्रवेश केला. सर्वसाधारणपणे, सत्ताधारी नवीन सदस्यांना सत्ताधारी बाकांवर बसावे लागते, मात्र रासने यांना विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसण्याची चूक झाली. यावेळी अजित पवार हे सभागृहात उपस्थित होते. त्यांनी हेमंत रासने यांना हाताला धरून सत्ताधारी बाकावर घेऊन आले. (MLA Oath Taking Ceremony)
(हेही वाचा- Comedian Sunil Pal Missing : कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता प्रकरणी चार दिवसांनी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल)
हे सर्व दृश्य पाहून सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. या घटनेने जणू काही सभागृहातील वातावरण अधिक हलके केले. यावेळी हेमंत रासने यांनीही त्या क्षणी हलकेपणाने हसत बसण्याची वेळ आली आणि अजित पवार यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. (MLA Oath Taking Ceremony)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community