ई-कॉमर्स कंपनी वॉलमार्टच्या (Walmart) वेबसाईटवर हिंदू (Hindu) देवतांची चित्रे असलेली चप्पल आणि स्विम सूट विकण्यावरून अमेरिकेतील हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या हिंदू समाजाच्या लोकांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर वॉलमार्टवर धार्मिक भावनांचा अपमान केल्याचा आरोप करत या उत्पादनांची विक्री लवकरच थांबवण्याची मागणी हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने (Hindu American Foundation) केली आहे. त्यांनी वॉलमार्टला पत्र लिहून हिंदूंचे (Hindu) प्रथम पुजनीय दैवत भगवान श्रीगणेशाच्या प्रतिमेचा अयोग्य आणि अपमानास्पद वापर केल्याचे म्हटले आहे. वॉलमार्टनेही यावर कारवाईचे आश्वासन दिले.
( हेही वाचा : Comedian Sunil Pal Missing : कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता प्रकरणी चार दिवसांनी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल)
दरम्यान हिंदू समाजाच्या रोषानंतर वॉलमार्टने (Walmart) वेबसाइटवरून ही उत्पादने काढून टाकली. याबाबत माहिती देताना हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने (Hindu American Foundation) स्वतः वॉलमार्टचे आभार मानले आहेत. वॉलमार्ट कंपनीच्या वेबसाईटवर ही उत्पादने विकली जात होती. मात्र, हे वादग्रस्त उत्पादन भारतात खरेदीसाठी उपलब्ध नव्हते.
काय आहे प्रकरण?
हिंदू अमेरिकन फाऊंडेशनचे (Hindu American Foundation) सदस्य प्रेम कुमार राज (Prem Kumar Raj) यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉलमार्ट (Walmart) कंपनीच्या वेबसाइटवर हिंदूंचे प्रथम पुजनीय दैवत भगवान श्रीगणेशाचे फोटो असलेले चप्पल आणि स्विमसूट विकण्यास ठेवले होते. चॅप्स नावाची कंपनी वेबसाइटवर हे उत्पादन विकत आहे. त्यानंतर प्रेम कुमार राज यांनी वॉलमार्टकडे समाजमाध्यमांद्वारे तक्रार करून या वस्तूंची विक्री त्वरित थांबवावी, अशी विनंती केली.
दरम्यान हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने (Hindu American Foundation) सांगितले आहे की, जर एखाद्या उत्पादन विक्री कंपनीला हिंदूंच्या चिन्हांच्या प्रतिमेचा वापर करायचा असेल तर आम्ही मार्गदर्शक तत्त्वे देण्यास तयार आहोत. त्यादरम्यान हिंदू अमेरिकन फाऊंडेशनच्या (Hindu American Foundation) तक्रारीनंतर वॉलमार्टने (Walmart) त्यांच्या वेबसाइटवर अशा उत्पादनांच्या विक्रीबद्दल खेद व्यक्त केला. तसेच या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी पावले उचलू, असे ही वॉलमार्टने सांगितले. त्यानंतर ४८ तासांच्या आत वॉलमार्टवरून (Walmart) ते उत्पादन काढून टाकण्यात आले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community