बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंवर होणारे अत्याचार थांबायला तयार नाही. दिवसेंदिवस हिंदूंवर अमानुष हल्ले होत आहेत. त्यामुळे आता त्याचे पडसाद आसाममध्ये उमटले आहेत. येथील हॉटेल्समध्ये बांगलादेशातील नागरिकांना (Bangladesh Citizens) प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जोवर बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार थांबत नाहीत, तोवर तेथील नागरिकांना हॉटेल्समध्ये प्रवेश देणार नाही, अशी भूमिका आसाममधील बराक खोऱ्यातील हॉटेल्सच्या संघटनेने घेतली आहे.
(हेही वाचा CM Devendra Fadnavis यांचा ‘तो’ ड्रीम प्रोजेक्ट पुन्हा चर्चेत)
बराक खोऱ्यातील कछार, श्रीभूमी (पूर्वीचे करीमगंज) आणि हायलाकांडी या तीन जिल्ह्यांमध्ये बांगलादेशींना (Bangladesh Citizens) प्रेवशबंदी करण्यात आली आहे. बराक व्हॅली हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबुल राय पत्रकारांशी बोलताना म्हणाले, बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या परिस्थितीत जोवर सुधारत होत नाही आणि हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोवर आम्ही शेजारील देशाच्या कोणत्याही नागरिकाला (Bangladesh Citizens) बराक खोऱ्यातील तीन जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे ठेवणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे. हा आमचा निषेध व्यक्त करण्याचा मार्ग आहे. याआधी बजरंग दलाने सिलचर येथे आयोजित जागतिक प्रदर्शनाच्या आयोजकांना बांगलादेशी उत्पादनांची विक्री करणारे दोन स्टॉल बंद करण्यास सांगितले होते आणि त्यांची मागणी मान्य करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community