MLA Oath Ceremony : भाजपाच्या ‘या’ आमदारांनी घेतली संस्कृतमधून शपथ

157
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर शनिवार ०७ डिसेंबरला विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा विधानसभेच्या इमारतीत झाला. या शपथविधी सोहळ्याला सत्ताधारी पक्षाचे आमदार वेगवेगळ्या रंगाच्या फेटे घालून विधानसभेच्या आवारात येताना दिसले. यावेळी भाजपा आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री तथा आमदार एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी भगव्या रंगाचे फेटे घातलेले दिसले. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उपमुख्यमंत्री तथा आमदार अजित पवार (Ajit pawar) यांच्या आमदारांनी गुलाबी फेटे घातलेले दिसले. या शपथविधी सोहळ्याला गिरीश महाजन यांच्यासह संस्कृतमधून शपथ घेतेल्या आमदारांची सध्या जोरदार चर्चा रंगू लागली आहे.  (MLA Oath Ceremony)

शनिवारपासून विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या अध्ययतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra fadanvis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजपा नेते आणि जामनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार गिरी महाजन (Girish Mahajan) यांनी संस्कृतमध्ये मंत्रीपदाची शपथ घेताना दिसले.
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांचा ‘तो’ ड्रीम प्रोजेक्ट पुन्हा चर्चेत)
दरम्यान, महाजन यांच्या शपथविधी सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यानंतर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे (Seema Hire) यांनीही संस्कृतमध्ये शपथ घेतली. त्यानंतर भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरही (Prashant Thakur) संस्कृतमध्ये आमदारकीची शपथ घेताना दिसले. यावेळी सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांनीही संस्कृतमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली.

(हेही वाचा – Comedian Sunil Pal Missing : कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता प्रकरणी चार दिवसांनी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल)

महाविकास आघाडीचा शपथविधीवर बहिष्कार, पण ‘या’ दोन आमदारांनी घेतली शपथ
दरम्यान, महाविकास आघाडीने शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला असताना, महाविकास आघाडीचे दोन आमदार अबू आझमी (Abu Azmi) आणि बापू पठारे (Bapu Pthare) यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. अबू आझमी हे महाविकास आघाडीसोबत आहेत. तर बापू पठारे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.