- सुजित महामुलकर
राज्य विधिमंडळ विशेष अधिवेशनात शनिवारी ७ डिसेंबर २०२४ या दिवशी २८८ पैकी १७३ नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. यात काहींनी हिंदी भाषेत तर एका सदस्याने सिंधी भाषेत शपथ घेतली. पण या १७३ पैकी सात आमदारांनी संस्कृत भाषेत तर उर्वरित सर्व आमदारांनी मराठीत शपथ ग्रहण केल्याने सभागृहात मराठीचाच डंका वाजला. (MLA Oath Ceremony)
कॉंग्रेसचा बहिष्कार
राज्य विधानसभेत महायुतीचे २३० आमदार असून भाजपा १३२, शिवसेना (शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाला ४१ आमदार आहेत. शनिवारी विरोधी पक्षातील कॉंग्रेस आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला तर शिवसेना ऊबाठा आणि राष्ट्रवादी (शप) आमदार काही वेळाने सभागृहाबाहेर पडले. त्यामुळे केवळ सत्ताधारी २३० पैकी १७३ आमदारांचा शपथविधी पार पडला उर्वरित आमदारांना रविवारी ८ डिसेंबर या दिवशी शपथ दिली जाईल. (MLA Oath Ceremony)
(हेही वाचा – Rahul Gandhi विरोधात ममता बॅनर्जी यांनी थोपटले दंड)
एकमेव आमदाराचे सिंधीला प्राधान्य
ज्या आमदारांनी शपथ घेतली त्यात भाजपाचे उल्हासनगरचे आमदार कुमार ऐलाणी यांनी सिंधी भाषेत शपथ घेतली. सिंधी भाषेत शपथ घेणारे ऐलाणी हे एकमेव आमदार आहेत. (MLA Oath Ceremony)
भाजपा, सपा, ‘एमआयएम’चे हिंदी
हिंदी भाषेत तीन आमदारांनी शपथ घेतली त्यात प्रत्येकी एक समाजवादी पक्ष, एमआयएम आणि भाजपाचा आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, ‘एमआयएम’चे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक आणि भाजपाचे पराग शाह यांनी हिंदुतून शपथ ग्रहण केली. (MLA Oath Ceremony)
(हेही वाचा – Walmart च्या वेबसाईटवर श्रीगणेशाचा फोटो असलेला स्विमसूट विक्रीला; हिंदूंच्या विरोधानंतर कंपनीचा माफीनामा)
सात आमदारांची संस्कृतला पसंती
संस्कृत भाषेतून शपथ घेणाऱ्यांची संख्याही यापूर्वी दोन-तीन होती मात्र शनिवारी सात आमदारांनी संस्कृत भाषेत शपथ घेत तिचा सन्मान वाढवला. विशेष म्हणजे हे सगळे भाजपाचे आमदार आहेत. यात गिरीश महाजन, प्रशांत ठाकूर, सीमा हिरे, नितेश राणे, प्रताप अडसद, सुधीर गाडगीळ आणि राम कदम यांचा समावेश आहे. गिरीश महाजन यांनी यापूर्वी पाच वेळा संस्कृत भाषेत शपथ घेतली असून ही सहावी वेळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (MLA Oath Ceremony)
तिघा मुस्लिमांची मराठी पसंद
उर्वरित १६२ आमदारांनी मराठीत शपथ घेत मराठीचा मान राखला. विशेष म्हणजे तीन मुस्लिम आमदारांनीही मराठी भाषेत शपथ घेतली. यात राष्ट्रवादीचे कॉंग्रेस (अजित पवार) हसन मुश्रीफ आणि सना मालिक आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी मराठी भाषेत शपथ घेतली. जयकुमार रावल यांनी यापूर्वी निवडून आले तेव्हा खान्देशी भाषेत शपथ घेतली आहे, मात्र शनिवारी रावल यांनी मराठी भाषेत शपथ ग्रहण केली. (MLA Oath Ceremony)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community