- ऋजुता लुकतुके
स्वीत्झर्लंड मधील चॉकलेट जगप्रसिद्ध आहेत. पण, चॉकलेटचं माहेरघर असलेल्या या देशात हा उद्योग अगदी सुरुवातीला कुणी सुरू केला माहीत आहे? त्याचं श्रेय जातं ते हेन्री नेस्ले यांना. १८६७ मध्ये त्यांनी व्हेली इथं दुग्धउत्पादन कंपनी सुरू केली. तिचं नाव होतं अँग्लो स्वीस मिल्क कंपनी. कन्डेन्स्ड दूध आणि दुग्धजन्य उत्पादनं ही तेव्हा या कंपनीची खासियत होती. पण, १९०५ मध्ये या कंपनीचं विलिनीकरण होऊन नेस्ले ही स्वतंत्र कंपनी अस्तित्वात आली आणि कंपनीची सूत्र फेरिन नेस्ले यांच्याकडे आली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धा सैनिकांना त्वरित ऊर्जा आणि ताकद मिळवून देणारं खाद्य म्हणून मिल्क चॉकलेट या खाद्यपदार्थाचा विकास झाला. टिकाऊ, साठवायला सोपा आणि साखरेमुळे ऊर्जा देणारा असा हा प्रकार अल्पावधीतच लोकप्रिय झाला. (Nestle India)
(हेही वाचा – Walmart च्या वेबसाईटवर श्रीगणेशाचा फोटो असलेला स्विमसूट विक्रीला; हिंदूंच्या विरोधानंतर कंपनीचा माफीनामा)
अमेरिकेत हर्शी आणि गिराडली तसंच स्वीत्झर्लंडमध्ये नेस्ले यांनी त्या काळात चॉकलेटमध्ये सर्वाधिक प्रयोग केले. दुसऱ्या महायुद्धापर्यंत नेस्ले कंपनी आशिया आणि आफ्रिकेत सगळीकडे पसरली होती. चहा, कॉफी, दुग्ध उत्पादनं आणि चॉकलेट ही त्यांची मुख्य उत्पादनं होती. भारतातही कंपनीचं अस्तित्व होतं. पण, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारचं लक्ष्य होतं ते देशात उत्पादन सुरू करण्याचं. त्यानुसार, नेस्लेनंही भारतात नेस्ले इंडिया नावाने आपली उपकंपनी स्थापन केली. सुरुवातीचा सगळा भर भारतात दुग्ध उत्पादनं सुरू करण्याचा होता. त्याचबरोबर चहा आणि कॉफी ही भारतीयांची आवडती पेयं होती. पंजाबमधील मोगा इथं नेस्लेचा पहिला प्रकल्प उभा राहिला. त्याचबरोबर दूध संकलन केंद्र सुरू झाली आणि चॉकलेट निर्मितीलाही सुरुवात झाली. कन्डेन्स्ड दूध हे कंपनीचं जगभरातील प्रमुख उत्पादन होतं. मिल्कमेड भारतात सुरू केलं हे नेस्लेनंच. (Nestle India)
(हेही वाचा – Konkan Railway वर दोन दिवसीय ब्लॉक; ‘या’ गाड्या उशिराने धावणार)
आताही नेसकॅफे, नेसटी, मिल्कीबार, मॅगी, मिल्कमेड, किट कॅट, बार वन, नेस्ले मिल्क, नेस्ले दही ही कंपनीची देशात तयार होणारी मुख्य उत्पादनं आहेत. त्याचबरोबर नाश्त्यासाठी वापली जाणारी सिरियल्सही कंपनी भारतात बनवते. नेस्ले इंडियाचं भारतातील मुख्यालय गुरुग्राम हरयाणा इथं आहे. त्याशिवाय दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता इथं कंपनीच्या शाखा आहेत. आणि भारतात त्यांची एकूण ८ उत्पादन केंद्र आहेत. पंजाबमधील मोगा, तामिळनाडूत चोलाडी, कर्नाटकात नंजनगुड, हरयाणात समलखा, गोव्यात फोंडा आणि बिचोलीम, उत्तराखंडमध्ये पंतनगर तसंच हिमाचल प्रदेशमध्ये तहलीवाल इथं कंपनीचे कारखाने आहेत. २०२४ मध्ये नेस्ले कंपनीत एकूण ९,००० लोक काम करतात. तर कंपनीचा शेअरही मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणीकृत आहे. (Nestle India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community