बांगलादेशातील हिंदू (Bangladesh Hindu Atrocities) आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आता जगभरातून आवाज उठवला जात आहे. इस्कॉनचे (ISKCON) धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास (Chinmay Krishna Das) यांच्या अटकेनंतर बांगलादेशातील अशांततेवर अमेरिकन काँग्रेसचे नेते राजा कृष्णमूर्ती (US Congress Leader Raja Krishnamoorthi) यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी बांगलादेशच्या (Bangladesh Voliance) अंतरिम सरकारला मानवी हक्कांचे संरक्षण, कायदेशीर संरक्षणाची हमी आणि हिंदूंवरील हल्ले थांबवण्याचे आवाहन केले. (Raja Krishnamoorthi)
‘हिंदूंवरील हिंसाचार अस्वीकार्य’
“बांगलादेशात हिंदू आणि इतरांविरुद्ध सुरू असलेला हिंसाचार अस्वीकार्य आहे आणि तो ताबडतोब बंद झाला पाहिजे,” असे ते म्हणाले. 25 ऑक्टोबर रोजी चितगाव येथे बांगलादेशच्या राष्ट्रध्वजावर भगवा ध्वज फडकावल्याबद्दल चिन्मय कृष्ण दास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बांगलादेशातील अशांतता आणखी तीव्र झाली. चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर बांगलादेशात विविध ठिकाणी निदर्शने झाली. हा विरोध इतका हिंसक झाला की चित्तगाव न्यायालयाबाहेर चिन्मय दासचे अनुयायी आणि बांगलादेशी अधिकारी यांच्यात चकमक झाली, ज्यात एका वकिलाचा मृत्यू झाला. (Raja Krishnamoorthi)
(हेही वाचा – MLA Oath Taking Ceremony : आणि जागा चुकलेल्या कसब्याच्या आमदारांना अजितदादा घेऊन आले… )
इस्कॉन कोलकात्याच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम दास प्रभू (Shyam Das Prabhu) आणि रंगनाथ दास ब्रह्मचारी यांना २९ नोव्हेंबर रोजी अटक केल्यावर चिन्मय कृष्ण दास यांना कारागृहात भेटायला गेले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. दंगलखोरांनी बांगलादेशातील इस्कॉन केंद्राची तोडफोड केल्याचा दावाही संघटनेच्या उपाध्यक्ष राधारमण दास यांनी केला.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community